असा आवाज आणि गायकी पुन्हा होणे नाही!-शिरीष कणेकर
शिरीष कणेकर, ज्येष्ठ लेखक लाखो,करोडोंमध्ये एक असा आवाज असतो जो पुन्हा ऐकायला मिळत नाही किंवा तो होऊ पण शकत नाही. लता मंगेशकर यांचाही असाच आवाज होता आणि अशीच गायकी होती. ही गायकी मुळात पहिल्यापासून आहे तशीच होती अगदी शेवटपर्यंत. त्यात ना कोणता बदल झाला ना आपल्या कानांना तो बदल जाणवला. इतका लताचा स्वर दैवी होता.. […]
ADVERTISEMENT

शिरीष कणेकर, ज्येष्ठ लेखक
लाखो,करोडोंमध्ये एक असा आवाज असतो जो पुन्हा ऐकायला मिळत नाही किंवा तो होऊ पण शकत नाही. लता मंगेशकर यांचाही असाच आवाज होता आणि अशीच गायकी होती. ही गायकी मुळात पहिल्यापासून आहे तशीच होती अगदी शेवटपर्यंत. त्यात ना कोणता बदल झाला ना आपल्या कानांना तो बदल जाणवला. इतका लताचा स्वर दैवी होता.. जो या सम हाच अश्याच प्रकारचा आहे.
लता मंगेशकर यांच्याशी बोलताना मुळातच खूप टेन्शन यायचं. अहो मला सांगा इतकी मोठी व्यक्ती आपण काय बोलणार हिच्याशी… आपल्याला गाणी आवडतात म्हणून त्यावर लता मंगेशकर यांच्याशी चर्चा करायची हेच मला मुळात टेन्शन आणण्यासारखं होतं. पण जशीजशी माझी त्यांच्यासोबत ओळख वाढत गेली तेव्हा एक जाणवलं की लता मंगेशकर पण जर आपण बाजूला ठेवलं तर त्यांचं हसणं,वागणं,बोलणं हे अतिशय साधं होतं. आपण लता मंगेशकरांशी बोलतोय असं मुळातच वाटायचं नाही.. इतकं साधेपण त्यांनी जपलं होतं. अगदी शेवटपर्यंत.
व्हेंटिलेटरवर असताना लता मंगेशकर यांनी मागवला होता इयरफोन, जाणून घ्या काय होतं यामागचं कारण..










