ओम-स्वीटूच्या मैत्रीत नवं वळण; मैत्रीचा लॉकडाऊन संपून सुरु होणार प्रेमाचा अनलॉक
एका गोड नात्याची कथा सांगणारी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद मिळतोय. अवघ्या काही काळात ही मालिका लोकप्रिय झालीये. ‘अन्विता फलटणकर’ आणि ‘शाल्व किंजवडेकर’ ह्या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडलेय. प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. आता आता ही […]
ADVERTISEMENT

एका गोड नात्याची कथा सांगणारी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद मिळतोय. अवघ्या काही काळात ही मालिका लोकप्रिय झालीये. ‘अन्विता फलटणकर’ आणि ‘शाल्व किंजवडेकर’ ह्या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडलेय.

प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. आता आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर आलीये. ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताना दिसणार आहे. ओम स्वीटू ला प्रपोज करणार आहे. स्वीटूला देखील हे सुंदर क्षण खूप हवे हवेसे वाटतायत, काय असेल स्वीटू चं उत्तर?











