यू -ट्यूबर नामरा कादिर पोलिसांच्या जाळ्यात; व्यावसायिकाला फसवून रचला होता ‘हनी ट्रॅप’
एका व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये फसवणाऱ्या युट्यूबर नामरा कादिरला पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून 80 लाख रुपये जप्त केले आहेत. तर पती विराट बेनिवाल याच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नमाराला अटक केली. अखेर, या यूट्यूबरने व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात कसे अडकवले, जाणून घेऊया… नामरा कादिर हे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध नाव आहे. युट्यूबवर […]
ADVERTISEMENT
एका व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये फसवणाऱ्या युट्यूबर नामरा कादिरला पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून 80 लाख रुपये जप्त केले आहेत. तर पती विराट बेनिवाल याच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नमाराला अटक केली. अखेर, या यूट्यूबरने व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात कसे अडकवले, जाणून घेऊया…
ADVERTISEMENT
नामरा कादिर हे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध नाव आहे. युट्यूबवर तिचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी, इंस्टाग्रामवर 2 लाखांहून अधिक युजर्स तिला फॉलो करतात. ती खूप सुंदर दिसते. पण खरं रुप वास्तव तेव्हा समोर आले जेव्हा 24 नोव्हेंबर रोजी एका व्यावसायिकाने गुरुग्राममधील सेक्टर-50 पोलिस ठाण्यात तिच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली.
नमाराने आपल्याकडून 80 लाख रुपये उकळल्याचे व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले. यामध्ये तिचा पती विराट बेनिवालचाही समावेश आहे. दोघांनी तिला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळले. व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले की, “मी कामानिमित्त सोहना रोडच्या रॅडिसन हॉटेलमध्ये नामराकादिर नावाच्या मुलीशी भेटलो होतो. ती एक YouTuber आहे, जिचा व्हिडिओ मी पाहिला होता. तिने माझी विराट बैनीवालशीही ओळख करून दिली जो एक YouTuber देखील आहे आणि तिचा मित्र आहे. तिने माझ्या फर्ममध्ये काम करण्यास होकार दिला आणि दोन लाख रुपये अडवान्स मागितले, असं त्यांनी सांगिलते.
हे वाचलं का?
तो म्हणाला, “मी तिला त्याच दिवशी दोन लाख रुपये दिले कारण मी नमाराला काही काळापासून ओळखत होतो. नंतर, जेव्हा मी तिच्याकडे जाहिरातीचे काम आणले आणि तिला समजावून सांगितले तेव्हा तिने हो म्हटले आणि आणखी 50,000 रुपये मागितले, जे मी तिला लगेच दिले. त्यानंतर तिने माझे काम केले नाही. नामरामला म्हणाली की काम फक्त एक निमित्त आहे, ती मला पसंत करते आणि तिला माझ्याशी लग्न करायचे आहे. बहिणीच्या लग्नानंतर ती मला माझे पैसे परत करेल. मला पण ती आवडली आणि आम्ही एकत्र हँग आउट करू लागलो. विराट नेहमी तिच्यासोबत असायचा, एकेदिवशी नामरा आणि त्याने मला दारू पाजली.
धमकी देऊन 70-80 लाख रुपयांची फसवणूक
व्यावसायिक पुढे म्हणाला, “आम्ही तिघांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि झोपलो. सकाळी उठल्यावर नामराने माझ्याकडे माझे कार्ड आणि माझी आय वॉच मागितली. आणि मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मी नकार दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, असे सांगितले. मी घाबरलो आणि तिला विनंती केली की आपण मित्र आहोत आणि मी काही चुकीचे केलेले नाही, त्यामुळे तिने हे करू नये. त्यानंतर विराट बनीवालने शस्त्र काढून सांगितले की तो तिचा नवरा आहे आणि तिला चांगला ओळखतो. मी त्याचे ऐकले नाही तर तो मला अडकवेल. या घटनेनंतर मी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि आत्तापर्यंत एकूण 70-80 लाख रुपयांचा माल आणि रोख रक्कम दिली असून, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असं तो व्यावसायिक म्हणाला.
ADVERTISEMENT
वडिलांनी दिला तक्रार करण्याचा दिला सल्ला
पीडित व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले की, “नमाराने माझा फोन घेतला आणि सर्व पुरावे हटवले आणि फोन रीसेट केला. जेव्हा माझे पैसे संपले, तेव्हा मी त्यांना सांगितले की मला आता सोडा, परंतु तरीही त्यांनी मला धमकावले, म्हणून मी माझ्या वडिलांच्या खात्यातून 5 लाख रुपये काढले. मग माझ्या वडिलांनी मला माझ्या पैशाबद्दल विचारले, तर मी त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही. मग त्यांनी माझे खाते तपासले, मग मी त्यांना सत्य सांगितले. त्यानंतर त्यांनी मला तक्रार दाखल करण्यास सांगितले, असं तो म्हणाला. पोलिसांनी नमाराला अटक केली असून फरार विराट बेनिवालचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT