मुंबईतील तरुणी WhatsApp Video कॉलवर व्हायची निर्वस्त्र, अनेक तरुणांना ‘असं’ करायची ब्लॅकमेल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विकास राजूरकर, चंद्रपूर

ADVERTISEMENT

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक युवक एका सुंदर मुलीच्या जाळ्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Video कॉलवर स्वत: निर्वस्त्र होऊन तरुणांना ही निर्वस्त्र होण्यासाठी भाग पाडणं आणि नंतर व्हीडिओ रेकॉर्ड करून व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागण्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. गोंडपीपरी तालुक्यातील एका पीडित वकिलाने याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

हे वाचलं का?

आधी एका अनोळखी मुलीचा WhatsApp वर Hello मॅसेज येतो. DP वर सुंदर मुलीचा फोटो असतो आणि सुंदर मुलीचा मॅसेज बघून तरुण मुलं असो किंवा इतर कोणी पुरुष त्याने त्या मॅसेजचा रिप्लाय दिला की मग सुरू होते मैत्री, अश्लील व तरुणांना उत्तेजित करणारे मॅसेज.

यानंतर Video कॉल करून अश्लील हावभाव करुन तरूणांना घायाळ करीत स्वत: निर्वस्त्र होऊन तरूणाला देखील निर्वस्त्र होण्यास भाग पाडते. त्यानंतर हा व्हीडिओ कॉल रेकार्ड करून त्याचा वापर तरूणांकडून पैसे उकळण्यासाठी केला जातो. दरम्यान, तरुणी एवढ्यावरच थांबत नाही तर तिचे सहकारी पोलीस असल्याची बतावणी करीत संबंधित तरुणांना कॉल करतात आणि तरूणीने तक्रार दाखल केल्याचे सांगतात आणि संबंधित व्यक्तीकडून पैशाची मागणी करतात.

ADVERTISEMENT

दरम्यान, या प्रकरणात अनेक तरूण अडकले आहेत. चंद्रपूर येथील गोंडपिपरी तालुक्यात अश्या तरूणांचा आकडा मोठा असल्याचे बोलले जात आहे. बदनामीचा भीतीने तरूणांनी पोलिसांकडेही पाठ फिरविली आणि तरुणीला पैसे दिले असल्याचं समजतं आहे.

ADVERTISEMENT

या प्रकाराने तरूण मुलं मानसिकरीत्या खचून जात आहेत. अश्यात गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावातील वकील तरूणाने गोंडपिपरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा छडा पोलीस कसा लावणार याकडेच आता पीडित तरुणांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. गोंडपिपरीत तक्रार दाखल झाल्याने आता अनेक तरुण हळूहळू पुढे येऊ लागले आहेत. दरम्यान, या तरूणीने जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनाही गंडविल्याची चर्चा आहे.

Mumbai: मुंबईतील शिवसेना आमदाराला सेक्स चॅट केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न

दरम्यान, अनोळखी मोबाइल नंबरवरून आलेला कॉल, WhatsApp मेसेज टाळण्याचं आव्हान गोंडपिपरी पोलिसांनी केले आहे.

मागील काही दिवसात सेक्सटॉर्शनच्या या घटना अधिक वाढू लागल्या आहेत. ज्याद्वारे अनेक बड्या-बड्या लोकांना देखील ब्लॅकमेल करण्याचा गोरखधंदा वाढीस लागला आहे. यामागे बरंच मोठं रॅकेट देखील असल्याचं आता हळूहळू समोर येत आहे. त्यामुळे पुरुषांनी अधिक सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT