तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत मलंगगड भागात तरूणांना मारहाण, दोन तरूणींचा विनयभंग
केवळ तोकडे कपडे घातल्याचे कारण देत मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरूण आणि दोन तरुणीना त्या ठिकाणी असलेल्या 6 ते 8 टवाळखोर मुलांनी बेदम मारहाण केली. हे सगळं प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नाही तर या टवाळखोरांनी तरूणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न विनयभंग केल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वतःची कशीबशी […]
ADVERTISEMENT

केवळ तोकडे कपडे घातल्याचे कारण देत मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरूण आणि दोन तरुणीना त्या ठिकाणी असलेल्या 6 ते 8 टवाळखोर मुलांनी बेदम मारहाण केली. हे सगळं प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नाही तर या टवाळखोरांनी तरूणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न विनयभंग केल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वतःची कशीबशी सुटका करून घेत नेवाळी पोलीस ठाणं गाठलं मात्र पोलिसांकडून त्यांना मेडिकल करून या तसेच इथे तक्रार होणार नाही हिल लाईन ला जा असे सांगत वाटेला लावण्यात आले. मात्र यातील पीडित तरुणीने हिंमत न हारता सोशल मीडियावरून या घटनेला वाचा फोडताच जागे झालेल्या पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.
या घटनेनंतर मलंगगड परिसर सर्वसामान्यांसाठी नाहीच का? तरुणींनी नेमका कोणता पेहराव करावा हे ठरविण्याचा अधिकार यांना दिला कोणी? असा सवाल उपस्थित करत अशा समाजकंटकांवर कारवाई करत वेळीच याला आवर घातला जावा अन्यथा नागरिकांना पर्यटन स्थळी देखील स्वताच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेऊनच जावे लागणार का? असा प्रश्न देखील विचारला गेला आहे.
काय घडलं?









