बुलढाणा : मुलीच्या नातेवाईकांनी घेराव घातला अन्…; पोलीस स्टेशनबाहेरच तरुणावर प्राणघातक हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जका खान, बुलढाणा

ADVERTISEMENT

घरातून पळून जाऊन लग्न केलेल्या प्रेमी युगुलावर पोलीस ठाण्याच्या बाहेरच हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर ही धक्कादायक प्रकार घडला. प्रेमी युगुलाला मुलीकडून नातेवाईकांनी घेरल्यानंतर अज्ञात व्यक्तीने तरुणाच्या पोटात गुप्तीने वार केला. यात तरुण गंभीर जखमी झाला.

पळून गेलेल्या प्रेमी युगुलाने पोलीस स्टेशनमध्ये हजर होत स्वतःच्या मर्जीने लग्न केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर बाहेर पडताना तरुणीच्या नातेवाईकांनी जमाव करून वाद घातला आणि त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. मंगळवारी (4 जानेवारी) रोजी रात्री 9 ते 10 च्या सुमारास शिवाजीनगर पोलीस स्टेशनसमोर ही घटना घडली.

हे वाचलं का?

हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला आधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर अकोला येथील रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमन उर्फ रघु विजय तिवारी व त्याची प्रेयसी हे दोघे 25 ऑक्टोबर 2021 रोजी घरातून निघून गेले होते. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

ADVERTISEMENT

पोलिसांकडून तरुणींचा शोध सुरू होता. दरम्यान, 4 जानेवारी रोजी अमन उर्फ रघु विजय तिवारी व मुलगी हे दोघेही लग्न करून पोलीस स्टेशनला हजर झाले.

आपण स्वतः मर्जीने पळून जाऊन लग्न केल्याची माहिती पोलीस स्टेशनला दिली. पोलीस प्रेमी युगुलांचा जबाब नोंदवत असताना प्रेमीयुगुल पोलीस स्टेशनला आल्याची माहिती तरुणीच्या नातेवाईकांना समजली. त्यामुळे त्यांनी पोस्टेला धाव घेत तेथे गर्दी केली. दरम्यान, रात्री 9 ते 10 च्या सुमारास जोडपे जबाब देऊन बाहेर पडले. त्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनसमोरच वाद सुरु केला.

यावेळी जमावातील अज्ञात व्यक्तीने रघु तिवारी याच्या पोटात गुप्तीने वार केला. यामध्ये रघु गंभीर जखमी झाला. घटना पोलीस स्टेशनसमोरच घडल्यानं पोलिसांनी तत्काळ दखल घेत रघु तिवारी यास सामान्य रुग्णालयात भरती केलं.

यावेळी घटनेची माहिती मिळताच रघु तिवारीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र यावेळी रघु तिवारी याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आलं. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT