युसुफ लकडवालाचे शरद पवार- राजीव गांधींशीही संबंध, फोटो दाखवत मोहित कंबोज यांचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शरद पवार, राजीव गांधी, अहमद पटेल, संजय राऊत या सगळ्यांशी युसुफ लकडावालासोबत चांगले संबंध होते आणि आहेत. युसुफ लकडावालाच्या महाबळेश्वरच्या हॉटेलवर संजय राऊत अनेकदा जाऊन राहतात. लकडावाला यांचे मातोश्रीवर नेहमीच येणं-जाणं होतं असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना मोहित कंबोज यांनी उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

नवनीत राणांच्या अडचणी संजय राऊतांनी वाढवल्या?, शोधलं डी-गँग कनेक्शन

संजय राऊत यांनी काय आरोप केला ?

हे वाचलं का?

नवनीत राणा यांच्या निवडणुक प्रतिज्ञापत्रातील एक छोटा भाग आपल्या ट्विटर अकाऊंटवर संजय राऊतांनी पोस्ट केला आहे. ज्यात नवनीत राणा यांच्या राणा एज्युकेशन सोसायटीला युसूफ लकडावाला या व्यक्तीने 80 लाखांचं कर्ज दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. युसूफ लकडावाला याला काही दिवसांपूर्वी ईडीने मनी लाँड्रींग प्रकरणात अटक केली होती, ज्यात कारागृहातच त्याचा मृत्यू झाला. युसूफ लकडावालाचे डी गँगशी संबंध असून ईडीने या प्रकरणाची चौकशी केली आहे का? हा देखील राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

‘…तेव्हा राऊत माझ्याकडे पैसे मागायचे आणि मी द्यायचो देखील’, वाचा आणखी काय म्हणाले मोहित कंबोज?

ADVERTISEMENT

यानंतर आज मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना थेट राजीव गांधी आणि शरद पवारांसोबत युसुफ लकडवालाचे फोटो ट्विट केले आहेत. एवढंच नाही तर आता लवंडे संजय राऊत काय बोलणार? असाही प्रश्न त्यांनी त्यांच्या ट्विटमधून विचारला आहे.

ADVERTISEMENT

महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशात भोंग्यांपासून सुरू झालेलं राजकारण आणि हनुमान चालीसावरून सुरू झालेला राणा दाम्पत्याचा राडा चांगलाच गाजला. हे प्रकरण इतकं पुढे गेलं की राणा दाम्पत्याला तुरुंगात जावं लागलं. त्यानंतर संजय राऊत यांनी एक ट्विट करून युसुफ लकडावालाकडून नवनीत राणांनी ८० लाख रूपये घेतले आहेत असा आरोप केला. संजय राऊत यांच्या आरोपानंतर आता मोहित कंबोज यांनी थेट फोटोच ट्विट करत युसुफ लकडावालाचे मातोश्री, संजय राऊत, शरद पवार, राजीव गांधी, अहमद पटेल या सगळ्यांशी संबंध होते आणि आहेत असा आरोप केला आहे.

आणखी काय म्हणाले मोहित कंबोज?

संजय राऊत काय बोलतात ते त्यांचं त्यांनाही कळत नाही. त्यांनी सलीम-जावेदच्या गोष्टी बंद कराव्याचा. ज्या माणसाला काहीच कळत नाही तो माणूस राज्य सभेवर इतकी वर्षे खासदार कसा? असाही प्रश्न मोहित कंबोज यांनी विचारला आहे. युसुफ लकडावालाच्या महाबळेश्वरच्या हॉटेलवर जाऊन संजय राऊत राहतात असाही दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT