Maharashtra ZP Election Result: जिल्हा परिषद-पंचायत समिती पोटनिवडणूक निकाल, फक्त एका क्लिकवर
राज्यात विविध जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 85 तर पंचायत समितीच्या 144 जागांवरील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झालं. आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यापार्श्वभूमीवर आरक्षणामुळं कोणत्या पक्षाच्या किती जागा रद्द झाल्यात आणि किती कसं चित्र आहे, याचा आढावा घेणारा वृत्तांत… जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल.. महाराष्ट्रात सहा जिल्ह्यात 85 जागांवर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका पार पडल्या. ज्यापैकी भाजपने […]
ADVERTISEMENT
राज्यात विविध जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 85 तर पंचायत समितीच्या 144 जागांवरील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झालं. आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यापार्श्वभूमीवर आरक्षणामुळं कोणत्या पक्षाच्या किती जागा रद्द झाल्यात आणि किती कसं चित्र आहे, याचा आढावा घेणारा वृत्तांत…
जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल..
महाराष्ट्रात सहा जिल्ह्यात 85 जागांवर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका पार पडल्या. ज्यापैकी भाजपने सर्वाधिक 22 जागांवर विजय मिळवला. तर त्या पाठोपाठ काँग्रेसने 19, राष्ट्रवादी काँग्रेसने 15, शिवसेनेने 12, इतर वेगवेगळ्या स्थानिक पक्ष 12, अपक्ष 4 आणि सीपीआय 1 जागेवर निवडून आले आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाचे लाइव्ह अपडेट
नागपूर जिल्हा परिषद: सध्या हाती आलेल्या निकालानुसार 16 जिल्हा परिषद जागांपैकी 5 ते 6 जागेवर काँग्रेस आघाडीवर, शेकाप एका जागेवर विजयी तर 1 जागेवर भाजप आघाडीवर.
ADVERTISEMENT
1. नागपूर:
ADVERTISEMENT
नागपूर: जिल्हा परिषद अंतिम निकाल (एकूण जागा 16)
-
भाजप-02
-
शिवसेना-00
-
राष्ट्रवादी-3
-
काँग्रेस-9
-
शेकप – 01
-
गोंडवाना गणतंत्र पार्टी 01
-
इतर-00
जिल्हा परिषद 12 वाजेपर्यंत अपडेट
-
भाजप-01
-
शिवसेना-00
-
राष्ट्रवादी-0
-
काँग्रेस- 4
-
शेकप – 01
-
गोंडवाना गणतंत्र पार्टी 01
-
इतर-00
-
काटोल तालुक्यातील येनवा जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे समीर उमप हे 2453 मतांनी विजयी झाले आहे. ही जागा मागील वेळेस शेकापने जिंकली होती. शेकापने आपली जागा कायम ठेवली आहे.
-
दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्हा परिषद विजयी उमेदवार
हिंगणा (डिगडोह ): संजय जगताप (काँग्रेस)
मौदा (अरोली) : योगेश देशमुख (काँग्रेस)
काटोल (येणवा): समीर उमप (शेकाप)
कामठी (गुमथळा): दिनेश ढोले (काँग्रेस)
नागपूर (गोधनी): कुंदा राऊत (काँग्रेस)
रामटेक (बोथीया पालोरा): हरीश उईके (गोंगापा )
कामठी (वडोदा): अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस)
काटोल (पारडसिंगा): मीनाक्षी संदीप सरोदे (भाजपा)
पारशिवनी (करभाड ): अर्चना भोयर (काँग्रेस)
2. अकोला: अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये पंचायत बहुजन आघाडीचे उमेदवार आघाडीवर. प्रवक्ते प्रसन्नजीत गवई यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमध्ये सहा जिल्हा परिषदच्या जागा वंचित बहुजन जिंकले असून नऊ जागा पंचायत समिती गटामध्ये विजयी झाले आहे.
-
अकोला जिल्हा परिषद मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शंकरराव इंगळे विजयी.
-
अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या मूळ गावातून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार विजय झाले असून या ठिकाणी केंद्रीय माजी मंत्री व खासदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण तिथे वंचितने विजय मिळवला आहे.
-
जिल्हा परिषदेचा पहिला निकाल शिवसेनेच्या बाजूने. अकोट तालुक्यातील अकोलखेड जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे जगन्नाथ निचळ विजयी
3. वाशिम: जिल्हा परिषद पोटनिवडणूक: भामदेवी सर्कल, भरिपच्या वैशाली लडे विजयी
-
भरिपचे किशोर ढाकूलकर विजयी
-
वाशिम जिल्ह्यातील काटा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या संध्या वीरेंद्र देशमुख 143 मतांनी विजयी
-
कुपटा जिल्हा परिषद सर्कलमधून भाजपचे उमेश ठाकरे विजयी
4. धुळे: जिल्हा परिषदेचे पहिले दोन निकाल हाती. लामकानी गटातून भाजपाच्या धरती देवरे तर कापडणे गटातून राष्ट्रवादीचे किरण पाटील विजयी
-
धुळ्यातील शिरपूरचे 6 गण भाजपाच्या ताब्यात.
-
6 पैकी 6 गण भाजपच्या ताब्यात.. अमरीश पटेल यांचे वर्चस्व कायम
5. पालघर: सरावली गणातून भाजप उमेदवार रेखा दिलीप सकपाळ विजयी
-
पालघर पंचायत समिती सरावली (अवधनगर) गणातून शिवसेना उमेदवार ममता विलास पाटील विजयी
-
पालघरच्या जिल्हा परिषदच्या दुसऱ्या गटात देखील शिवसेनेचा विजय, शिवसेनेच्या उमेदवार नीता पाटील विजयी
-
पालघर जिल्हा परिषद गट सावरे एम्बुर येथून शिवसेना उमेदवार विनया पाटील विजयी
किती जिल्हा परिषदेच्या जागांचा निकाल?
-
पालघर-15
-
नागपूर -16
-
धुळे – 15
-
नंदूरबार – 11
-
अकोला – 14
-
वाशिम -14
किती पंचायत समितीच्या जागांचा निकाल?
-
पालघर-14
-
नागपूर -31
-
धुळे -30
-
नंदूरबार -14
-
अकोला -28
-
वाशिम -27
अकोल्यातील चित्र कसं आहे?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका अकोला जिल्हा परिषदेच्या 14 ओबीसी गटातून विजयी झालेल्या सदस्यांना बसला आहे. तर पंचायत समितीच्या 28 ओबीसी सदस्यांनाही आपल पद गमवावं लागलं आहेय. यामुळे ५३ सदस्य संख्या असलेल्या अकोला जिल्हा परिषदेत 14 सदस्यांच्या पद गच्छंतीनंतर आता फक्त 39 सदस्य उरले आहेत. सदस्यत्व रद्द झालेल्या 14 पैकी 6 सदस्य वंचित बहुजन आघाडीचे आहेत. दोन वंचित पुरस्कृत अपक्ष, भाजपच्या सातपैकी तीन सदस्यांना पद गमवावं लागलं आहे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्याला गमवावं लागलं.
नागपूर…
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी आणि 31 पंचायत समितीच्या जागांसाठी आज मतदान पार पडले. नागपूर जिल्ह्यात एकूण 60 टक्के मतदान झालं आहे. काँग्रेस पक्षाच्या 31 जागा होत्या. 7 रद्द झाल्या. विद्यमान 24 जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागा होत्या. 4 जागा रद्द झाल्या, तर सध्या 6 जागा आहेत. भाजपच्या 15 जागा होत्या. 4 रद्द झाल्या आहेत, तर सध्या 11 जागा आहेत. शिवसेनेची 1 जागा आहे. शेकापची 1 जागा होती, ती रद्द झाली. त्यामुळे शेकापच्या खात्यात एकही जागा नाही.
धुळे…
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. 14 गट व 28 गणांसाठी मतदान झालं असून, धुळे जिल्हा परिषदेवर भाजपशी सत्ता होती. एकूण 56 जिल्हा परिषद जागांपैकी भाजपकडे सध्या 27 जागा आहेत. शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 3, काँग्रेस 6 जागा आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला दोन जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास भाजपच्या उमेदवारांना आहे.
नंदुरबार…
जिल्ह्यात परिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नंदुरबार तालुक्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. शहादा तालुक्यात स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला आहे. तर तिकडे भाजपने युती करण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रंगत ही वाढणार आहे.
वाशिम जिल्ह्यात काय असेल चित्र?
वाशीम जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समित्यांच्या 27 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झालं आहे. जिल्हा परिषदवर महाविकास आघाडीची सत्ता होती. मात्र पोटनिवडणुकीत एकमत न झाल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले असल्याने आता ही निवडणूक बहुरंगी होणार असल्याचं चित्र आहे. राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा स्वतंत्र लढणार असून, वंचित आणि जनविकास आघाडी यांची युती झाली आहे.
पालघरमध्ये कोणत्या पक्षाच्या किती जागा झाल्या रद्द?
जिल्हा परिषद 15
शिवसेना – 03
राष्ट्रवादी – 07
भाजप – 04
माकपची – 01
ADVERTISEMENT