Zoom मीटिंग अचानक सुरू झाला अश्लील Video,अन् मीटिंगमधल्या लोकांनी…
Zoom meeting obscene adult video play :एका झूम मीटिंगमध्ये (Zoom Meeting) अचानक अश्लील व्हिडिओ सुरु झाल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर झूम मीटिंगचा पुरता गोंधळ उडाला होता. या अचानक घडलेल्या घटनेमुळे मीटिंग आयोजित करणाऱ्याला तत्काळ मीटिंग रद्द करावी लागली होती.
ADVERTISEMENT
Zoom meeting obscene adult video play : गेल्या काही दिवसांपासून अचानक सार्वजनिक ठिकाणी अथवा मीटिंगमध्ये अश्लील व्हिडिओ सुरु झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मध्यंतरी बिहारच्या पटना रेल्वे स्टेशनवर (Patna Railway Station) अचानक पॉर्न व्हिडिओ सुरु झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाचा आता एका झूम मीटिंगमध्ये (Zoom Meeting) अचानक अश्लील व्हिडिओ सुरु झाल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर झूम मीटिंगचा पुरता गोंधळ उडाला होता. या अचानक घडलेल्या घटनेमुळे मीटिंग आयोजित करणाऱ्याला तत्काळ मीटिंग रद्द करावी लागली होती. (zoom meeting obscene adult video play host clarifies then meeting has been hack)
ADVERTISEMENT
तज्ञ मंडळींचा मीटिंगमध्ये सहभाग
देशासह जगभरात कोरोनानंतर वर्क फ्रॉम होमचा (Work from home) ट्रेंड सुरु झाला. या ट्रेंडनंतर घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मीटिंग घेण्यासाठी झूम मीटिंग अस्तित्वात आली होती. त्यामुळे अनेकजण घर बसल्या अथवा कोणत्याही ठिकाणाहून झूम मीटिंगमध्ये (Zoom Meeting) सहभागी व्हायचे. अशीच एक मीटिंग अमेरिकेमधील आयलंड हेल्थ सेंटरने आयोजित केली होती.सेक्सुअली ट्रान्समिटेडच्या वाढत्या प्रकरणांवर ही मीटिंग बोलावण्यात आली होती. या मीटिंगमध्ये तज्ञ डॉक्टरांसह काही ट्रेनी डॉक्टर सहभागी झाली होती.
अश्लील व्हिडिओच लागला…
मीटिंग सुरु झाली होती आणि होस्ट संवाद साधत होता. या दरम्यानच प्रेझेंटेशन दाखवत असतानाच अचानक एक अश्लील व्हिडिओ सुरु झाला होता. या व्हिडिओत अश्लील हावभाव आणि घाणेरडे आवाज बाहेर येत होते. काही केल्या हा व्हिडिओ बंदच होत नव्हता. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून अनेकांचा गोंधळ उडाला होता. मीटिंग सुरु ठेवावी की बंद करावी असा अनेकांना प्र्श्न पडला होता. अनेकांनी तर लॅपटॉपच बंद केला होता. व्हिडिओ बंदच होत नसल्याचे पाहून मीटिंग आयोजित करणाऱ्या लुसी डायसने सर्वांना मीटिंगमधून बाहेर पडण्याचे आदेश दिले होते.
हे वाचलं का?
मीटिंग झाली हॅक
खऱं तर ही मीटिंग हॅक करण्यात आली होती. ही मीटिंग हॅक करून त्याच्यामध्ये अश्लील व्हिडिओ सुरु करण्यात आला होता.त्यामुळे मीटिंगचा पुरता गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर लुसीने दुसरी मीटिंग आयोजित केली होती. ही मीटिंग आयोजित करून लुसीने सर्वांची त्या घटनेप्रकरणी माफी मागितली होती. त्यानंतर पुन्हा मीटिंगला सुरुवात केली होती.
दरम्यान याआधी बिहारच्या पटना रेल्वे स्टेशनच्या (Patna Railway Station) एका टीव्हीवर पॉर्न व्हिडिओ सुरु झाला होता. हा व्हिडिओ पाहून प्रवाशांचा पुरता गोंधळ उडाला होता. या संदर्भातवा व्हिडिओ नंतर सोशळ मीडियावर व्हायरल झाला होता. हे प्रकरण इतक्यावरच थांबल नाही तर त्या व्हिडिओतील पॉर्नस्टारने नंतर त्या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. या घटनेची खुप चर्चा झाली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT