Sushilkumar Shinde यांनी राजकारणात नातवाला केलं लाँच?
Sushilkumar Shinde has launched his grandson in politics: सोलापूर: काँग्रेसचे (Congress) माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांची मोठी कन्या स्मृती शिंदे यांचा चिरंजीव शिखर पहरिया (Shikhar Pahria) हा काल (14 जानेवारी) सोलापूरमधील (Solapur) प्रसिद्ध सिद्धेश्वर महायात्रेत आवर्जून उपस्थित होता. त्यामुळेच आता सुशीलकुमार यांचा राजकीय वारसदार शिखर असल्याची जोरदार चर्चा सध्या […]
ADVERTISEMENT

Sushilkumar Shinde has launched his grandson in politics: सोलापूर: काँग्रेसचे (Congress) माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांची मोठी कन्या स्मृती शिंदे यांचा चिरंजीव शिखर पहरिया (Shikhar Pahria) हा काल (14 जानेवारी) सोलापूरमधील (Solapur) प्रसिद्ध सिद्धेश्वर महायात्रेत आवर्जून उपस्थित होता. त्यामुळेच आता सुशीलकुमार यांचा राजकीय वारसदार शिखर असल्याची जोरदार चर्चा सध्या सोलापूरमध्ये रंगली आहे. (sushilkumar shinde launched his grandson in politics who is shikhar pahria)
शिखर पहरिया याला सुशीलकुमार शिंदेंनी थेट सिद्धेश्वर यात्रेत आणून राजकीयदृष्ट्या लाँच करण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे. याचनिमित्ताने सुशीलकुमार यांनी आपल्या विरोधकांना मेसेज देण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता आपल्या राजकीय शिखर पहारिया हाच आहे असा संदेश तर शिंदे देऊ पाहत नाहीत ना अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे.
सोलापुरात काल (14 जानेवारी) ग्रामदैवत सिद्धेश्वर महायात्रेचा महत्वपूर्ण विधी अक्षता सोहळा संमती कट्ट्यावर पार पडला. या अक्षता सोहळ्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पत्नी उज्वला शिंदे आणि नातू शिखर पहारिया यांच्यासह उपस्थित होते.
Nitin Gadkari : सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी खुर्ची रिकामा ठेवायला सांगितली