अभिनेत्री स्वरा भास्करने काँग्रेसला का झापलं?
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर फार अॅक्टिव असते. अनेक सामाजिक प्रश्नांवर स्वरा ती वक्तव्य करत असते. अनेकदा काँग्रेसची बाजू घेत भाजपविरोधात स्वरा अनेक मुद्द्यांवर परखड मतं मांडते. मात्र नुकतंच स्वराने एका मुद्द्यावरून महाराष्ट्र काँग्रेसला झापलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना महाराष्ट्रात शूटींग करू देणार नसल्याचं वक्तव्य केलं. याच मुद्द्यावरून […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर फार अॅक्टिव असते. अनेक सामाजिक प्रश्नांवर स्वरा ती वक्तव्य करत असते. अनेकदा काँग्रेसची बाजू घेत भाजपविरोधात स्वरा अनेक मुद्द्यांवर परखड मतं मांडते. मात्र नुकतंच स्वराने एका मुद्द्यावरून महाराष्ट्र काँग्रेसला झापलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना महाराष्ट्रात शूटींग करू देणार नसल्याचं वक्तव्य केलं. याच मुद्द्यावरून स्वरा भास्करने काँग्रेसला धारेवर धरलं आहे. यासंदर्भात स्वरा भास्करने ट्विट केलंय. ती म्हणते, “किती मुर्खपणाची गोष्ट आहे…तुम्ही यापेक्षा काहीतरी चांगलं करू शकता.” शिवाय हे ट्विट तिने काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅगही केलं आहे.
दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांसारख्या इतर मोठ्या कलाकारांना इंधन दरवाढीबाबात आता ट्विट का नाही करत सवाल केला होता. युपीए सरकारच्या काळात जेव्हा पेट्रोलच्या किंमती 70 रुपये प्रतिलिटर होत्या तेव्हा ट्विट केलं होतं तर आता पेट्रोलच्या किंमती शंभरी गाठल्यानंतरही का ट्विट करत नाही असा सवाल त्यांनी केला. शिवाय या मुद्द्यानंतर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचं महाराष्ट्रात चित्रपटांचं शुटिंग आणि चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता.
दुसरीकडे स्वरा भास्कर सातत्याने काँग्रसेच्या समर्थनार्थ वक्तव्य करताना दिसते. देशातील शेतकरी आंदोलनावर देखील भाजपच्या विरोधात जाऊन तिने आंदोलनाला समर्थन दिलं होतं. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी काँगेस आणि इतर पक्षाकडून करण्यात आलेल्या भारत बंदलाही स्वराने पाठिंबा दिला होता.