T20 WC, Ind Vs NZ: सलग दुसऱ्या पराभवामुळे भारताचं आव्हान धोक्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्ध सलामीचा सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडनेही भारतावर ८ विकेटने मात करत आपलं आव्हान कायम राखलं आहे. भारताने विजयासाठी दिलेलं १११ धावांचं आव्हान न्यूझीलंडने सहज पूर्ण करुन दाखवलं. या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलमधलं स्थान आता धोक्यात आलं आहे.

न्यूझीलंडने भारताला स्वस्तात गुंडाळल्यानंतर भारतीय चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली. मार्टीन गप्टील आणि डॅरेल मिचेल यांनी सावध सुरुवात करुन दिली. परंतू जसप्रीत बुमराहने मार्टीन गप्टीलला आऊट करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर डॅरेल मिचेल आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी महत्वाची पार्टनरशीप करत भारताच्या आक्रमणातली हवाच काढून टाकली. बुमराहने मिचेलला आऊट करत आणखी एक विकेट घेतली. परंतू तोपर्यंत पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. यानंतर विल्यमसन आणि कॉनवे यांनी न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

दरम्यान, पाकिस्तानविरुद्धचा सामना गमवल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी करेल अशी सर्वांनाच आशा आहे. पण टीम इंडियाच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा निराशाच केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमवल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलं. पण यावेळी पुन्हा एकदा टीम इंडियाची खराब सुरुवात झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, या मोठ्या सामन्यासाठी टीम इंडियाने दोन बदल केले. पाकिस्तान सोबतचा सामना गमवल्यानंतर भारतीय संघ या स्पर्धेत काहीसा बॅफूटवर गेला.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून फक्त 110 धावाच केल्या. यावेळी सगळ्याच फलंदाजांनी साफ निराशा केली. यावेळी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा याने सर्वाधिक 26 रन्स केल्या. जाडेजाशिवाय एकाही फलंदाजाला फार धावा करताच आल्या नाही.

ADVERTISEMENT

सलामीवीर केएल राहुल आणि इशान किशन यांना चांगली सुरुवात करुन देता आली नाही. इशान फक्त 4 धावांवर बाद झाला. तर रोहित शर्मा 14 आणि केएल राहुल हा 18 धावा करुन बाद झाला. तर कर्णधार विराट कोहलीला देखील फारशी चमक दाखवता आली नाही. तो फक्त 9 रन करुन माघारी परतला. तर रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या देखील मोठ्या खेळी करु शकल्या नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ फक्त 110 धावाच करु शकला.

ADVERTISEMENT

दुसरीकडे न्यूझीलंडच्या बॉलर्सनी चांगली गोलंदाजी केली. यावेळी ट्रेंट बोल्टने जबरदस्त गोलंदाजी करत 4 ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या आणि फक्त 20 धावाच दिल्या. तर ईश सोधीने देखील चांगली गोलंदाजी करत फक्त 17 धावा देत 2 बळीही घेतले.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव यांना डच्चू देण्यात आला आहे. यावेळी इशान किशन आणि शार्दुल ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे. विराट कोहलीच्या म्हणण्यानुसार, सूर्यकुमार यादवच्या पाठीचे काही स्नायू दुखावले असल्याने त्याला वगळ्यात आलं आहे.

भारत प्लेइंग-11: इशान किशन, रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड प्लेइंग-11: मार्टिन गुप्टिल, डी. मिचेल, केन विल्यमसन, जेम्स निशम, डी. कॉनवे, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट

टॉस दरम्यान विराट कोहली काय म्हणाला?

नाणेफेक दरम्यान कर्णधार विराट कोहली म्हणाला की, ‘मी नाणेफेक जिंकली असती तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. आम्हाला या सामन्यात चांगली सुरुवात हवी आहे. लवकर विकेट न गमवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जेणेकरून शेवटी अधिक धावा करता येतील. आमच्याकडे गोलंदाज आहेत जे विकेट घेऊ शकतात पण त्यासाठी फलंदाजांना धावा कराव्या लागतात.’ विराट कोहली म्हणाला की, ‘सर्व खेळाडूंनी दीर्घ विश्रांतीमध्ये सराव केला आहे.’

T20 World Cup : न्यूझीलंडविरुद्ध Hardik ला खेळवणं महागात पडू शकतं – आगरकरचा टीम इंडियाला सल्ला

दरम्यान, संघात करण्यात आलेल्या या बदलाबाबत विराट कोहली म्हणाला की, सूर्यकुमार यादवच्या पाठीच्या स्नायूमध्ये काही समस्या आहेत. त्यामुळे त्याच्या जागी इशान किशनला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे की सूर्यकुमार यादवला वैद्यकीय पथकाने विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे तो मैदानात नाही आणि हॉटेलमध्येच थांबला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT