Tauktae Cyclone : सागरी किनारे असलेल्या जिल्ह्यांतील 12 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं स्थलांतर-मुख्यमंत्री - Mumbai Tak - tauktae cyclone more than 12000 people evacuated from coastal districts says cmo - MumbaiTAK
बातम्या

Tauktae Cyclone : सागरी किनारे असलेल्या जिल्ह्यांतील 12 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं स्थलांतर-मुख्यमंत्री

Tauktae या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमधल्या 12420 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील चक्रीवादळावर लक्ष ठेवून आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सागरी […]

Tauktae या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमधल्या 12420 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील चक्रीवादळावर लक्ष ठेवून आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत (Mumbai) सध्या मोठ्या प्रमाणात तौकताई चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम दिसून येत आहे. पहाटेपासूनच मुंबईतील अनेक भागात प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. तसंच मुसळधार पाऊस देखील सुरु आहे. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडं (Tree) कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसंच काही ठिकाणी मोठमोठे होर्डिंग्स देखील कोसळल्याचं समोर आलं आहेत.

मुंबईतला वांद्रे-वरळी सी लिंक (Sea Link ) अर्थात सागरी सेतू हा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेने ट्विट करून तशी माहिती दिली आहे. वांद्रे-वरळी सी लिंक वापरणाऱ्यांनी तिथे जाऊ नये, पर्यायी मार्गांचा वापर करावा असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. एवढंच नाही तर गरज नसल्यास मुळीच घराबाहेर पडू नका असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. खरंतर शनिवारीच या संदर्भातली माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली होती.

Tauktae Cyclone Live: तौकताई चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रात दाखल, वाऱ्याचा तुफान वेग आणि मुसळधार पावसाच्या सरी

तौकताई हे वादळ आज (17 मे) सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुंबईपासून आत 150 किमी खोल समुद्रात पोहचलं आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच तुफान वेगाने वारा देखील वाहत आहे.

तौकताई वादळाचा प्रवास हा लांबवरचा असल्याने महाराष्ट्रतील जवळजवळ सर्वच किनारपट्टी भागातून त्याची वाटचाल झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून हे वादळ पुढे सरकून आज (17 मे) पहाटे 2 वाजेच्या सुमारास रायगड (Raigad) जिल्ह्यात पोहचलं. त्यामुळे श्रीवर्धन (Shrivardhan), हरिहरेश्वर (Harihareshwar), दिवे-आगार या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत होते.

दरम्यान, गेल्या वर्षी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा (Nisarga Cyclone) लँडिंग पॉईंट हा रायगड जिल्ह्यातच होता. त्यामुळे येथे प्रचंड नुकसान झालं होतं. या नुकसानात येथील नागरिक अद्याप सावरलेले देखील नाहीत तोच आता तौकताई चक्रीवादळाचा त्यांना फटका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + two =

Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल