परतीच्या पावसामुळं मराठवाड्यातील शेती संकटात; शापित शेतकर्यांचं दृष्टचक्र कधी संपणार?
मराठवाड्याचा शेतकरी हा गेल्या अनेक वर्षांपासून कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाना तोंड देत आहे. शाश्वत सिंचनाच्या साधनांची तोकडी साधने उपलब्ध असल्याने येथील शेती मोसमी पावसावर निर्भर आहे. मात्र, कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ असे विसंगत हवामान अलिकडे शेतकर्यांच्या राशीला येत आहे. एकतर पेरलं जाईल का याचा भरवसा नाही, त्यात पेरलं ते उगवलं जाईल […]
ADVERTISEMENT

मराठवाड्याचा शेतकरी हा गेल्या अनेक वर्षांपासून कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाना तोंड देत आहे. शाश्वत सिंचनाच्या साधनांची तोकडी साधने उपलब्ध असल्याने येथील शेती मोसमी पावसावर निर्भर आहे. मात्र, कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ असे विसंगत हवामान अलिकडे शेतकर्यांच्या राशीला येत आहे. एकतर पेरलं जाईल का याचा भरवसा नाही, त्यात पेरलं ते उगवलं जाईल का? उगवलं ते जगेल का? जगलं ते वाढेल का? वाढलं ते पदरात पडेल का अन् पदरी पडलेलं चांगल्या भावात विकेल का? अशा विवंचनेतच येथील शेतकऱ्यांचा हंगाम मार्गस्थ झालेला असतो.
वेळेवर पाऊस नाही तर रोगांचा हाहाकार
यंदा तर एकाच हंगामात विलंबाने आगमन, विसंगत व अनियमित पर्जन्यमान, त्यात पुन्हा अतिवृष्टी, पावसाच खंड, पुन्हा संततधार अशी नानारूपं पहायला मिळाली. हे काय कमी होते,ते मराठवाड्यातील प्रामुख्यानं घेतलं जाणारं प्रमुख अशा सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. उगवण, अतिवृष्टी, गोगलगाय, खोडकीड, खोडअळी, तांबेरा आदी प्रादुर्भावाचा विळखा पावसाच्या सोबतीला होताच. मागच्या 8 दिवसांपासून परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं काढणीला आलेलं पीक खराब होत असून होता तोंडाला आलेला घास पाऊस हिरावून घेत आहे. काढणी पुर्व आणि काढणीपश्चात अशी नुकसान पहावयास मिळत आहे. पावसामुळं सोयाबीनसारखं पीक एकतर नासून जातं नाहीतर काळ पडतं. काळं पड्लेल्या धान्याला बाजारात मातीमोल भाव मिळतं. तर झाडावर असणाऱ्या पिकांना पावसामुळं तिथंच मोड फुटायला सुरु झालं आहे. म्हणून लावणीला आलेलं खर्च तरी निघेल का? या प्रश्नानं शेतकऱ्यांची घालमेल होत आहे.
मराठवाड्यात लाखो हेक्टर्सना पावसाचा फटका