सरकार माझ्यावर पाळत ठेवतं आहे-संभाजीराजे छत्रपती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सरकार माझ्यावर पाळत ठेवतं आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश मला माहित नाही. पण मला हेच लक्षात येत नाही की माझ्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे? असं ट्विट करत आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून संभाजीराजे छत्रपती यांनी हा आरोप केला आहे. मात्र त्यांचा अंगुलीनिर्देश नेमका कोणत्या सरकारकडे आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी हा आरोप केला आहे की मोदी सरकारवर हा आरोप केला आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. संभाजीराजे यांच्या ट्विटनंतर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यामध्येही हाच प्रश्न त्यांना विचारला जातो आहे.

मराठा आरक्षणासाठी मी उद्याही राजीनामा देण्यास तयार: खा. संभाजीराजे

खासदार संभाजीराजे छत्रपती हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरच्या प्रश्नामुळे चर्चेत आहेत. 28 मे रोजी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठा आरक्षण प्रश्नी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संभाजी राजे यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे पत्रकार परिषदेत मांडले

रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यासाठी 4 तारीख आहे, पण कोव्हिडमुळे ती पुढे गेली आहे. रिव्ह्यू पिटिशन लोकांना दाखवण्यासाठी फाईल करू नका तर फुलप्रुफ असावा हा पहिला पर्याय

ADVERTISEMENT

दुसरा पर्याय क्युरेटिव्ह पिटिशन करणं हा आहे

ADVERTISEMENT

तिसरा पर्याय 342 A नुसार राज्यपालांकडे प्रस्ताव जाईल तो पुढे राष्ट्रपती आणि त्यानंतर संसदेकडे जाईल

संभाजीराजे छत्रपती यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या.

27 तारखेपर्यंत मराठा समाजाने संयम बाळगावा, संभाजीराजे छत्रपती आवाहन

संभाजीराजेंनी काय इशारा दिला आहे?

मराठा आरक्षणाबाबत 6 जून पर्यंत भूमिका स्पष्ट करा अन्यथा 7जूनला रायगडावरून मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे असं 28 मेच्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं. आम्हाला कुणाच्याही भांडणाशी घेणंदेणं नाही आमच्या समाजाला न्याय द्या. कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन मी बोलत नाही. मला कोणत्याही पक्षावर टीका करायची नाही असंही संभाजीराजे यांनी म्हटलं होतं. दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती यांनी सरकार त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचं म्हटलं आहे. पण महाविकास आघाडी सरकार म्हणजेच राज्य सरकार की केंद्र सरकार ही बाब मात्र त्यांनी स्पष्ट केलेली नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT