मुंबईत महापौर होत नाही तोपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स, नगरसेवकांचा पुढील 3 दिवसांचा मुक्काम ठरला!

मुंबई तक

Eknath Shinde Shiv Sena is engaging in hotel politics : शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना आज दुपारी तीन वाजता वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पक्षातील कोणताही नगरसेवक फुटू नये, तसेच सत्तास्थापनेदरम्यान एकसंघ राहावे, यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपला एकहाती महापौर करता येत नसल्याने शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

ADVERTISEMENT

Eknath Shinde Shiv Sena
Eknath Shinde Shiv Sena
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत महापौर होत नाही तोपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स

point

नगरसेवकांचा पुढील 3 दिवसांचा मुक्काम ठरला!

Eknath Shinde Shiv Sena is engaging in hotel politics : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापौरपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून सध्या मोठी रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ‘हॉटेल पॉलिटिक्स’चा मार्ग स्वीकारल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत महापौर निवडला जाईपर्यंत शिवसेनेचे सर्व निवडून आलेले नगरसेवक पुढील तीन दिवस वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत.

मुंबईत महापौर होत नाही तोपर्यंत शिवसेनेचं हाॅटेल पाॅलिटिक्स 

शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना तीन वाजता बांद्रा ताज लॅंड्स एंडला येण्याचे आदेश 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्व निवडून आलेले नगरसेवक वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये नेणार.

हे वाचलं का?

    follow whatsapp