पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचे, हवामान खात्याने दिला इशारा

अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता
पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचे, हवामान खात्याने दिला इशारा

पुढचे चार ते पाच दिवस राज्यातल्या अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. IMD चे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे उद्या (7 ऑक्टोबर) ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी हिंगोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यातील काही भागात 8 ऑक्टोबरला पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज.
पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज.इंडिया टुडे

9 ऑक्टोबरला नाशिक, पालघर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, कोल्पारू, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जेव्हा वीज कडाडत असेल त्यावेळी विशेष काळजी घ्या असंही आवाहन करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.