शिक्षकाचं क्रौर्य : विद्यार्थ्याने दुसऱ्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिल्याने डोकं आपटून दात पाडले
राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका शिक्षकाने एका मुलावर बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जालौरची घटना ताजी असताना उदयपूरमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाला एका खाजगी शाळेतील शिक्षकाने बेदम मारहाण केली आणि त्याचे दोन दात पाडले आचरट. मुलाचा दोष इतका होता की त्याने दुसऱ्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षकाविरोधात पोलिसात गुन्हा […]
ADVERTISEMENT

राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका शिक्षकाने एका मुलावर बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जालौरची घटना ताजी असताना उदयपूरमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाला एका खाजगी शाळेतील शिक्षकाने बेदम मारहाण केली आणि त्याचे दोन दात पाडले आचरट. मुलाचा दोष इतका होता की त्याने दुसऱ्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
शिक्षकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उदयपूर शहरातील हिरणमागरी पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एका खाजगी शाळेत विद्यार्थ्याने दुसऱ्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असता, रागाच्या भरात शिक्षकाने विद्यार्थ्याचे डोके टेबलावर आपटले. ज्यामुळे विद्यार्थ्याचे समोरचे दोन दात तुटले. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अन्य विद्यार्थ्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिल्याने शिक्षकाने सम्यकचं डोकं आपटलं