Viral : नवऱ्यानं सिक्रेट ठेवलं… घटस्फोटानंतर बायको बनली ‘मालामाल’

मुंबई तक

Viral news of divorce case : एखादी गोष्ट खोटी सांगताना ती आज न् उद्या अंगलट येऊ नये याचा विचार करुनच सांगावी लागते. अन्यथा त्या खोटं बोलल्याचा पश्चाताप आयुष्यभर करावा लागतो. असाच एक प्रकार चीनमध्ये घडला असून एक खोटं बोलल्यामुळे पतीला आपली ६० टक्के संपत्ती पत्नीच्या नावे करावी लागली आहे. पण दुसऱ्या बाजूला पत्नीचाही तो हक्क […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Viral news of divorce case :

एखादी गोष्ट खोटी सांगताना ती आज न् उद्या अंगलट येऊ नये याचा विचार करुनच सांगावी लागते. अन्यथा त्या खोटं बोलल्याचा पश्चाताप आयुष्यभर करावा लागतो. असाच एक प्रकार चीनमध्ये घडला असून एक खोटं बोलल्यामुळे पतीला आपली ६० टक्के संपत्ती पत्नीच्या नावे करावी लागली आहे. पण दुसऱ्या बाजूला पत्नीचाही तो हक्क असल्यामुळे पतीसाठी वाटणारी सहानुभूती काहीशी कमी होते. (Wife got 60% of the husband’s property as a result of divorce in China)

नेमकं काय घडलं?

चीनमधील ‘बिजींग डेली’च्या बातमीनुसार पती ली ने आणि पत्नी झांग से या दोघांमध्ये खडाजंगी झाली. यानंतर दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. यादरम्यान पतीने न्यायालयाला सांगितले की, माझ्याकडे फक्त 12 लाख रुपयांची ठेव आहेत.

परंतु, झांग से हिने कोर्टाला पती ली ने याच्या संपत्तीची चौकशी करण्याची विनंती केली. त्याच्या मालमत्तेची तपासणी केली असता, त्यांचं वार्षिक उत्पन्न साडेतीन कोटी रुपयांहून अधिक असल्याचं आढळून आलं. तसंच घटस्फोटाच्या प्रक्रियेपूर्वीच ली ने त्याच्या खात्यातून पैसे काढल्याचं आढळून आलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp