विरार : पाकीट चोरल्यानंतर पाठलाग करणाऱ्या तरुणाची चोरट्याने केली हत्या

चाकूने केलेल्या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू, आरोपीला अटकेत
विरार : पाकीट चोरल्यानंतर पाठलाग करणाऱ्या तरुणाची चोरट्याने केली हत्या

विरार रेल्वे स्थानकात घरी जाण्यासाठी निघालेल्या तरुणाची एका चोरट्याने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हर्षद वैद्य असं या मयत तरुणाचं नाव असून तो विलेपार्ले परिसरात राहतो. बुधवारी रात्री विरारमधील आपल्या नातेवाईकांच्या घरी पुजा संपवून घरी येत असताना हा प्रकार घडला.

विरार रेल्वे स्थानकाच्या तिकीट काऊंटरजवळ हर्षल रांगेत उभा असताना एक चोरटा त्याचं पाकीट हिसकावून पळायला लागला. हर्षदनेही प्रसंगावधान दाखवून त्या चोरट्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. पळता पळता हा चोरटा विरार रेल्वे स्थानकाच्या बाहेरील श्रेया हॉटेलच्या गल्लीत लपला.

हर्षदनेही हार न मानता या गल्लीपर्यंत त्याचा पाठलाग केला. यावेळी पकडण्यासाठी आलेल्या हर्षदवर चोरट्याने चाकूने हल्ला केला, या हल्ल्यात हर्षदचा जागीच मृत्यू झाला. परंतू त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पोलिसांनी चोरट्याला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.