चिंताजनक बातमी, महाराष्ट्रात 11 हजाराहून जास्त नवे Corona रुग्ण
मुंबई: राज्यातील जनतेची चिंता वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. त्यातच गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 11,141 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अवघ्या एका दिवसात 10 हजारांच्या वर रुग्ण सापडल्याने प्रशासन देखील हादरुन गेलं आहे. तसंच कोरोना पॉझिटिव्हिटी रेट देखील 13.16 टक्के एवढा झाला […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यातील जनतेची चिंता वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. त्यातच गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 11,141 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अवघ्या एका दिवसात 10 हजारांच्या वर रुग्ण सापडल्याने प्रशासन देखील हादरुन गेलं आहे. तसंच कोरोना पॉझिटिव्हिटी रेट देखील 13.16 टक्के एवढा झाला आहे. जो फारच अधिक असल्याचं मानलं जात आहे. याशिवाय अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील जवळजवळ 1 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. जी अत्यंत चिंताजनक बाब समजली जात आहे. आता या सगळ्याप्रकरणी राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या 24 तासात राज्यात सापडले 11,141 पॉझिटिव्ह रुग्ण
राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 11,141 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 38 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्के एवढा आहे. याशिवाय आणखी एक चिंतेची बाब म्हणजे आता राज्यात 97,983 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दुसरीकडे एक चांगली बाब म्हणेज आज राज्यात 6,013 कोरोना रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 20,68,044 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट हा 93.17 टक्के इतका आहे.