नागपुरात भीषण अपघात, बाइकवरील तिघांचा जागीच मृत्यू
योगेश पांडे, नागपूर: वेगात जाणाऱ्या टॅक्सी कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर स्वार पती-पत्नी व भाच्याचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील जुनोना फुके शिवारात घडली आहे. काल (17 एप्रिल) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ज्यामध्ये एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाला. एक लग्न आटोपून रामचंद्र नेहारे, […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, नागपूर: वेगात जाणाऱ्या टॅक्सी कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर स्वार पती-पत्नी व भाच्याचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील जुनोना फुके शिवारात घडली आहे.
काल (17 एप्रिल) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ज्यामध्ये एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाला. एक लग्न आटोपून रामचंद्र नेहारे, रंजना नेहरे व त्यांचा भाचा रोशन मुंगभाते हे गावाकडे परत येत असताना प्रवासी घेऊन जाणाऱ्या बोलेरो कारने त्यांच्या बाइकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, ज्यामध्ये बाइकचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. तर बाइकवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
दुसरीकडे अपघातग्रस्त कारही नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तीनही जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. तसंच कार चालकाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.