बडतर्फीची कारवाई झाली तर नुकसान नेत्यांचं नाही कर्मचाऱ्यांचच – अनिल परबांचा ST कर्मचाऱ्यांना सल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काही दिवसांपूर्वी एका संघटनेने संपातून माघार घेतली असली तरीही अनेक संघटना विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. हायकोर्टानेही कामगार संघटनांना संप न ताणण्याचे आदेश दिल्यानंतरही राज्यात बहुतांश ठिकाणी हा संप सुरुच आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा एसटीच्या कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे.

आम्ही कामगारांना बऱ्याच प्रमाणात समजावण्याचा प्रयत्न करतोय. मी अनेक शिष्ठमंडळांना भेटतोय. परंतू अजुनही काही कामगार विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अडून बसले आहेत. कोर्टानेही कामगारांना सांगितलं की तुम्ही दुखवटा किंवा संप एवढा ताणू शकत नाहीत. आम्हाला कोर्टाने आदेश दिले आहेत की कोर्टाचा अवमान केल्याच्या नोटीसा तुम्ही डेपोमध्ये लावा. आम्ही त्याप्रमाणे करतोय ही परंतू आमचं कर्मचाऱ्यांशी कोणतंही वैर नाही हे कामगारांनी समजून घ्यायला हवं. अनिल परब रत्नागिरीत बोलत होते.

धक्कादायक! राजापूरमध्ये निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, एसटी कर्मचारी आक्रमक

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कर्मचाऱ्यांनी लोकांना अडवू नये. आज जवळपास दीड महिना झाला. ज्येष्ठ नागरिक असोत, शाळकरी मुलं किंवा कॉलेजला जाणारी मुलं असो सर्वांनाच या संपाचा फटका बसतोय. जसं आमचं दायित्व हे कर्मचाऱ्यांप्रती आहे तसंच ते जनतेशीही आहे. म्हणूनच माझी विनंती आहे की कर्मचाऱ्यांनी संप ताणू नये, कामावर परत यावं. नाहीतर बडतर्फीची कारवाई सुरु झाली आहे. यामध्ये जे कामगार बडतर्फ होतील त्यांचं नुकसान कोणताही नेता भरुन देणार नाहीये. कामगारांना दोन महिन्याचा पगार मिळाला नाही तर नुकसान त्यांचच होणार आहे नेत्यांचं नाही हे कामगारांनी समजून घ्यायला हवं असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे.

संप संपवा, टोकाची भूमिका घ्यायला लावू नका! एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांची कळकळची विनंती

ADVERTISEMENT

मध्यंतरी राज्य सरकारने संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली. परंतू यानंतरही हा संप अजुनही सुरुच आहे. बाकीच्या गोष्टी अजुनही चर्चेसाठी खुल्या आहेत. परंतू केवळ एका शब्दासाठी अडून बसल्यामुळे हे कर्मचारी स्वतःचं आणि एसटीचं नुकसान करत आहेत. हे नुकसान भरुन येणारं नाहीये, आम्हाला लोकांनाही उत्तर द्यायचं आहे. एसटी ही अत्यावश्यक सेवेत येते, त्यामुळे या सर्व मुद्द्यांचा विचार करता कारवाई केली जाईल असं परब यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

मेस्मा लावल्यास एसटी कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार? काय आहे हा कायदा?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT