
Elon Musk आमि ट्विटर यांच्यात डील झाल्यानंतर कंपनीतून काही बड्या अधिकाऱ्यांची नोकरी जाण्याची चिन्हं आहेत. गेल्या महिन्यात ४४ अरब डॉलरमध्ये ट्विटर खरेदी करण्यात आलं आहे. या डीलची चर्चा चांगलीच रंगली होती. अशात आता ट्विटरमध्यल्या काही बड्या अधिकाऱ्यांची नोकरी जाण्याची चिन्हं आहेत. पराग अग्रवाल, विजया गाड्डे यांच्यासह आणखी काही लोकांची नोकरी जाण्याची शक्यता आहे.
Reuters ने दिलेल्या रिपोर्ट नुसार ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि पॉलिसी हेड विजया गाड्डे या दोघांचीही नोकरी जाऊ शकते. Twitter CEO पराग अग्रवाल यांच्यासोबत कर्मचाऱ्यांची मिटिंग पार पडली. या मिटिंगमध्ये कर्मचाऱ्यांनी आमच्या नोकरीचं काय होणार? असा प्रश्न विचारल्याचंही कळतं आहे. रॉयटर्सने त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे की एलॉन मस्क हे नव्या सीईओंच्या शोधात आहेत. त्यांनी नवा सीईओ शोधला आहे. फायनल डील झाल्यानंतर पराग अग्रवाल यांची नोकरी जाऊ शकते. गेल्या महिन्यात मस्क हे ट्विटरचे चेअरमन Bret Tayloer यांना म्हणाले की मला कंपनीच्या मॅनेजमेंटवर विश्वास नाही.
पराग अग्रवाल यांचं काय होणार?
पराग अग्रवाल यांनी गेल्या वर्षी जॅक डोर्सी यांना रिप्लेस केलं होतं. एलॉन मस्क यांची डील होईपर्यंत ते ट्विटरचे सीईओ असतील. पण डील पूर्ण झाल्यानंतर त्यांची नोकरी जाऊ शकते. ट्विटरचा नवा सीईओ कोण होणार? हे अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र पराग अग्रवाल यांना जर नोकरीवरून जायला सांगितलं तर त्यांना ४.३ कोटी डॉलर्स मिळतील असंही सांगण्यात येतं आहे.
मस्क यांच्या निशाण्यावर फक्त पराग अग्रवाल नाहीत. तर लीगल हेड विजया गाड्डेही आहेत. विजया यांना मस्क यांनी आधीच ट्विटरवर टार्गेट केलं आहे. The New York Post च्या बातमीनुसार एलॉन मस्क विजया गाड्डेंनाही कंपनीतून घरचा रस्ता दाखवण्यासाठी प्लान तयार करत आहेत. विजया गाड्डे यांना काढण्यात आलं तर त्यांना भरपाई म्हणून १.२५ कोटी डॉलर्स मिळतील.
विजया कंपनीत सर्वाधिक पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत. ट्विटरवर त्यांना एक ताकदवान महिला मानलं जातं. नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार विजया या एका मिटिंगनतंर भावनिक झाल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मस्क ट्विटरच्या पॉलिसींविषयी विजया यांनाच टार्गेट करत आहेत. आता नेमकं काय काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.