बारामती गोळीबारप्रकरणी दोन आरोपींना अवघ्या काही तासात अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे (Raviraj Taware) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहेत. तावरे यांच्यावर झालेला गोळीबार (Firing) हा राजकीय वादातून झाला की वैयक्तिक वादातून याचा पोलीस शोध घेत आहेत.

बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये काल (1 जून) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी रविराज तावरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी तावरे यांच्या छातीला लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. बारामतीतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया देखील यशस्वी झाल्याची माहिती मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयावर बारामतीत गोळीबार

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, पुण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपाधीक्षक मिलिंद मोहिते, डीव्हायएसपी नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांच्या विरोधी पथकाने नाकाबंदी करत याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबत तातडीने कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान या हल्ल्याबाबत अनेक कंगोरे असल्याची माहिती समोर येत आहे. रविराज तावरे हे स्वतः ठेकेदार असून विकास कामांमध्ये यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच मालेगाव आणि परिसरातील राजकीय वादंग देखील या हल्ल्यामागे असू शकते पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी दिली.

ADVERTISEMENT

…तुम्हाला बोललो की मग राग येतो ! जेव्हा अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फटकारतात

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

माळेगावच्या संभाजी नगर भागात रविराज आपली पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासह बाहेर आलेले असताना अचानक साखर कारखान्याच्या दिशेने जाणाऱ्या बुलेट गाडीवरील दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये रविराज गंभीर जखमी झाले. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतलं.

जखमी झाल्यानंतर देखील रविराज आपल्या कारमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते. पण गोळी त्यांच्या खांद्याला लागली होती त्यामुळे त्यांना कार चालवता येत नव्हती. दरम्यान, गोळ्यांचा आवाज ऐकताच जवळपास असणाऱ्या अनेकांनी रविराज यांच्या दिशेने धाव घेतली आणि दुसऱ्या एका खासगी वाहनात त्यांना उपचारांसाठी बारामतीला नेण्यात आलं. बारामतीच्या खासगी रुग्णालयात तावरे यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली, ज्यानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर मानली जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT