ठाकरेंचं कौतुक, फडणवीस यांच्यावर निशाणा; संजय राऊतांनी विरोधकांचा घेतला समाचार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण होत असून, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपकडून करण्यात येणाऱ्या सत्ता स्थापनेच्या दाव्याचा समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाचं कौतुक करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर राऊत यांनी […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण होत असून, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपकडून करण्यात येणाऱ्या सत्ता स्थापनेच्या दाव्याचा समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाचं कौतुक करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर राऊत यांनी रोखठोक सदरातून निशाणा साधला आहे.
संजय राऊत ‘रोखठोक’मध्ये काय म्हणाले?
“महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ पहाटेच घेतली त्या सोहळ्यासही दोन वर्षे पूर्ण झाली. मुख्यमंत्री ठाकरे सध्या पाठीच्या दुखण्यामुळे इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे, पण दोन वर्षांत प्रकृती बिघडली आहे, ती राज्यातील विरोधी पक्षाची. सरकारला दोन वर्षे झाली त्यानिमित्ताने चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ठाकरे सरकार आता लवकरच पडेल!’ म्हणजे तारखा देण्याच्या फंदातून व छंदातून भाजप अद्यापि बाहेर पडलेला नाही.”
“ठाकरे सरकार पडणार व पुन्हा आम्ही शपथ घेणार, असे पाटील यांना वाटत असेल तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. फक्त त्यांनी इतकेच स्पष्ट केले पाहिजे की, नव्या सरकारचा शपथविधी ते मध्यरात्री करणार की पहाटे? हेच पाटील काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यकारिणीत म्हणाले होते, ‘सरकार पडेल व आम्ही सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षाने आता बाहेर पडले पाहिजे. आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी लागेल.’ तेच पाटील चार दिवसांत ठाकरे सरकार पडेल असे छातीठोकपणे सांगतात.”