नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना सभागृहात झापलं; उद्धव ठाकरेंनी केलं तोंडभरून कौतुक
विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी तुम्ही मंत्री असाल, तुमच्या घरचे. हे सभागृह आहे, असं म्हणत चांगलीच तंबी दिली. विधान परिषदेतील हा प्रसंग सोशल मीडियावर चर्चिला गेला. आता यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही नीलम गोऱ्हे यांचं कौतुक करण्याचा मोह आवारला नाही. नीलम […]
ADVERTISEMENT

विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी तुम्ही मंत्री असाल, तुमच्या घरचे. हे सभागृह आहे, असं म्हणत चांगलीच तंबी दिली. विधान परिषदेतील हा प्रसंग सोशल मीडियावर चर्चिला गेला. आता यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही नीलम गोऱ्हे यांचं कौतुक करण्याचा मोह आवारला नाही.
नीलम गोऱ्हे यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या कार्याबद्दल भावना व्यक्त केल्या. “सर्वांना माहितीये की नीलम गोऱ्हे या आधी काही शिवसेनेच्या विचारांच्या नव्हत्या. सामाजिक कर्ता, चळवळीतील कार्यकर्ता आणि चळवळी महिला अशी त्यांची एकेकाळी ओळख होती. एके दिवशी मला निरोप आला की, नीलम गोऱ्हे यांना तुम्हाला भेटायचं. मला प्रश्न पडला की, या आपल्या विचारांच्या नाहीत. मग भेटून काय करणार? तरीही भेटलो. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला शिवसेनेत यायचं आहे.
“एकही विषय असा नाही की, मी त्यांच्यावर सोपवला आणि त्यांनी अर्धवट सोडला असं झालेलं नाही. अनेकदा असं व्हायचं की मी काही सांगायच्या आधीच नीलम गोऱ्हेंचा फोन यायचा की मी तिथे पोहोचलेय आणि तिथूनच बोलतेय”, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेची सांगितली.
“आपण फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. तो आहेच. पण अजूनही अशा घटना घडतात. महाराष्ट्रात तरी महिला अत्याचाराच्या घटना घडू नये. त्यात जात-पात-धर्म येता कामा नये. मग ती महिला बिलकिस बानो असो की, भंडाऱ्यातील ती पीडिता असो. सर्वच पक्षांनी अशा बाबतीत दया, माया, क्षमा नाही. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्याशिवाय या कोरड्या बोंबलण्याला अर्थ नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.