नारायण राणे म्हणाले ‘उभं राहायलाही दोन माणसं लागतात’; उद्धव ठाकरेंनी सोडलं मौन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. “दुसरं कुणी असतं, तर पदावर राहिलं नसतं. राजीनामा दिला असता”, अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. राणे यांनी केलेल्या टीकेला आज उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एका ओळीत उत्तर दिलं.

शस्त्रक्रिया झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर होते. गेल्या काही दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसून येत आहे. रविवारी (२० फेब्रुवारी) तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली.

…तर त्यांना भोगावं लागेल; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केसीआर यांचा भाजपला इशारा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात आणि गार्डनमध्ये उद्धव ठाकरे आणि केसीआर चर्चा करताना दिसले. या बैठकीनंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद आटोपून परत जात असताना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रकृतीबद्दल विचारणा केली. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचं नाव न घेता टोला लगावला.

‘तुमची प्रकृती कशी आहे?’, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले,”सांगितलं ना कुणातरी?” त्यानंतर पुन्हा प्रकृतीबद्दल विचारणा करण्यात आली. उद्धव ठाकरे म्हणाले, “मी आहे तसा तुमच्यासमोर उभा आहे,” उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.

ADVERTISEMENT

संजय राऊत सोमय्यांना म्हणाले XX; चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला सल्ला

ADVERTISEMENT

नारायण राणे काय म्हणाले होते?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेवर निशाणा साधताना उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीबद्दल भाष्य केलं होतं. “गेल्या सव्वादोन वर्षात शिवसेना कार्यकर्त्यांना काय मिळालं, यापेक्षा मातोश्री आणि चमच्यांना काय मिळालं याची आज ना उद्या चर्चा होईल. शिवसैनिक हे सगळं बघत आहेत. भेटणं नाही. दर्शन नाही. मी कुणाच्या आजारपणावर बोलणार नाही. दुसरं कुणी असतं, तर पदावर राहिलं नसतं. राजीनामा दिला असता. आता उभं राहायलाही दोन-दोन माणसं लागतात. या महाराष्ट्रात अशी पाळी कुणावर आली नाही”, असं राणे म्हणाले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT