भयंकर! रेल्वे स्थानकातून नेलं निर्जनस्थळी; उल्हासनगर स्थानकाजवळ अल्पवयीन मुलीवर बलात्कार

हातोड्याचा धाक दाखवून सोबतच्या मित्राला लावलं पळवून : नराधमाला कल्याण रेल्वे पोलिसांनी केली अटक
रेल्वे पोलिसानी आरोपीला ठोकल्या बेड्या...
रेल्वे पोलिसानी आरोपीला ठोकल्या बेड्या...PTI

मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्काराच्या अमानुष घटनेला २४ तास होत नाही, तोच उल्हासनगर स्थानक परिसरात एका १४ वर्षाच्या मुलीवर हातोड्याचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकावर मित्रासोबत बोलत असतानाच आरोपी हातोडा घेऊन आला व मुलीला स्थानकाजवळील निर्जनस्थळी नेत अत्याचार केला. रेल्वे पोलिसानी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

श्रीकांत गायकवाड अस आरोपीचे नाव असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी उल्हासनगर परिसरात आपल्या आजीसोबत राहते. ती आपल्या आईला भेटण्यासाठी शिर्डीला गेली होती. शिर्डीवरून शुक्रवारी रात्री (१० सप्टेंबर) ९ वाजण्याच्या सुमारास बसने ती कल्याणपर्यंत आली.

रेल्वे पोलिसानी आरोपीला ठोकल्या बेड्या...
मुंबई सुन्न! बलात्कार पीडितेची मृत्युशी झुंज संपली; डॉक्टरांचे प्रयत्न ठरले अपयशी

कल्याणमध्ये लोकल पकडून ती उल्हासनगर स्थानकात पोचली. उल्हासनगर स्थानकात उतरल्यानंतर स्कायवॉकवर तिला काही मित्र भेटले. त्यामुळे ती त्यांच्यासमवेत बोलत उभी होती. याचवेळी आरोपी श्रीकांत गायकवाड हा माथेफिरू तरुण तिथे आला. त्याने हातातील हातोडीने तिच्या मित्रांना धाक दाखवत पळवून लावले.

त्यानंतर या मुलीला धाक दाखवत जबरदस्तीने स्थानकाच्या बाजूला असलेल्या पडक्या वसाहतीच्या जवळ नेले. पीडित अल्पवयीन तरुणीने त्याला विरोध केल्याने तिला मारहाण करीत तिच्यावर अमानुष बलात्कार केला. यानंतर आरोपी पळून गेला.

रेल्वे पोलिसानी आरोपीला ठोकल्या बेड्या...
Sakinaka Rape case : साकीनाका असो की पुणे, सगळ्याच घटना भयानक; फडणवीसांनी व्यक्त केली चिंता

या घटनेनंतर मुलगी नातेवाईकाला सोबत उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात गेली. हद्दीचा विषय असल्यानं तिला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलं. त्यानंतर याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांनी श्रीकांत गायकवाड या नराधामला अटक केली.

दरम्यान, आरोपीनं मुलीला मारहाण केल्यानं जखमा झाल्या आहेत. तिच्या डोक्यालाही मार लागलेला असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत. नराधम गायकवाड यावर आधीही सात ते आठ गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती रेल्वे पोलीस वाल्मिक शार्दूल यांनी दिली असून मात्र बाईट देण्यास नकार दिला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in