रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर; राष्ट्रवादी भूमिका बदलणार? - Mumbai Tak - union minister ramdas athawale has appealed sharad pawar should support the modi government like nagaland - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर; राष्ट्रवादी भूमिका बदलणार?

Ramdas Athawale News : बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नागालँडमध्ये (Nagaland) जसा पाठिंबा दिला तसा केंद्रात पंतप्रधान मोदी (Modi Government) यांच्या सरकारलाही पाठिंबा द्यावा. आपल्यासारखा अनुभवी नेता आमच्या सोबत असला पाहिजे, त्यामुळे पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं आणि एनडीएमध्ये यावं अशी खुली ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले […]

Ramdas Athawale News :

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नागालँडमध्ये (Nagaland) जसा पाठिंबा दिला तसा केंद्रात पंतप्रधान मोदी (Modi Government) यांच्या सरकारलाही पाठिंबा द्यावा. आपल्यासारखा अनुभवी नेता आमच्या सोबत असला पाहिजे, त्यामुळे पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं आणि एनडीएमध्ये यावं अशी खुली ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पवारांना खुली दिली. (RPI(A) Chief Ramdas Athawale offer to NCP chief sharad pawar to support

धाराशिव जिल्हा दौऱ्यावर जाताना आठवले यांचं बीडमध्ये कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय. ५० फुटांचा हार, जेसीबी वरून फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी असं अत्यंत उत्साही वातावरणात आठवलेंचं स्वागत करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातील संघटनेच्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला.

आठवले पुढे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली असली तरी ती किती टिकेल हे सांगता येत नाही. प्रकाश आंबेडकर हे ठाकरेंसोबत गेले असले तरीही ते महाविकास आघाडी सरकारमध्ये गेलेले नाहीत. त्यामुळे ते कुठेही गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Ramdas Athawale यांचा ईशान्येत करिश्मा; नागालँडमध्ये RPI(A) दोन जागांवर विजयी

नागालँडमध्ये पवारांचा एनडीपीपी-भाजप सरकारला पाठिंबा :

नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप (BJP) युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. यात एनडीपीपीने २५ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने १२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. सोबत राष्ट्रवादी काँग्रेससह जनता दल युनाटेड आणि इतर पक्षांनीही एनडीपीपी-भाजप आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने ७ जागा जिंकल्या आहेत.

विधानसभेतील राडा ते पवारांचा BJP ला पाठिंबा; महाराष्ट्राच्या राजकारणातील ५ मोठ्या बातम्या

आठवलेंचाही भाजपला पाठिंबा :

नागालँडमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षानेही झेंडा फडकवला आहे. इतिहासात पहिल्यांदाच आठवले यांच्या पक्षाने नागालँडमध्ये २ जागांवर विजय मिळविला आहे. नागालॅंडमध्ये RPI (A) च्या तिकिटावर Y. लिमा ओनेन चँग (Y. Lima Onen Chang) यांनी नागालँडमधील नोक्सेन (Noksen) जागेवरुन विजय मिळविला आहे. तर इम्तिचोबा (Imtichoba) यांनी तुएनसांग सदर-II (Tuensang Sadar-II seat) ही जागा जिंकली आहे. दरम्यान, या निकालानंतर आता आठवले यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला असून एका मंत्रिपदाचीही मागणी केली आहे.

Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट? राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला… मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन! Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय? आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना… Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘या’ रस्त्यांवरून जाणं टाळाच भारतीय क्रिकेटर तापाने फणफणले! रोहित शर्मा म्हणाला.. 10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ? लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण… ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल… ओठांच्या आकारावरून समजते पर्सनॅलिटी, तुमची कशी आहे ओळखा? रिकाम्या पोटी गोड पदार्थांचं सेवन टाळा! नाहीतर… दारूचा ‘पेग’ कसा आला? काय आहे अर्थ?