धर्मांतर रॅकेट : कुणाल चौधरी निघाला अतिफ; नाशिकमध्ये उत्तर प्रदेश ATS ची कारवाई
उत्तर प्रदेशात काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या धर्मांतर रॅकेटचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने रविवार नाशिकमध्ये कारवाई करत नाशिक रोड येथून एका संशयिताला अटक केली आहे. अतिफ उर्फ कुणाल चौधरी असं आरोपीचं नाव आहे. तो कुणाल चौधरी या नावानेच परिसरात वास्तव्य करत होता. उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी त्याला नाशिकमधील आनंद नगर […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशात काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या धर्मांतर रॅकेटचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने रविवार नाशिकमध्ये कारवाई करत नाशिक रोड येथून एका संशयिताला अटक केली आहे.
अतिफ उर्फ कुणाल चौधरी असं आरोपीचं नाव आहे. तो कुणाल चौधरी या नावानेच परिसरात वास्तव्य करत होता. उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी त्याला नाशिकमधील आनंद नगर परिसरातून अटक केली.
उत्तर प्रदेश एटीएस पथकाने दिलेल्या माहितीप्रमाणे अतिफ धर्मांतर रॅकेट प्रकरणात मौलाना कलीम सिद्दीकीशी जोडलेला होता. मागील दोन वर्षांपासून तो संपर्कात होता. मौलाना कलीम सिद्दीकीला गेल्या आठवड्यात एटीएसने अटक केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अतिफने रशियातून वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो रशियातून परतला. भारतात वैद्यकीय प्रॅक्टीस केलेली नसल्यानं तो भारतीय वैद्यकीय परिषदेकडून (MCI) घेतल्या जाणाऱ्या परीक्षासाठी तो पात्र ठरला नाही. त्यानंतर अतिफने नाशिकमध्ये बेकायदेशीरपणे रुग्णांवर उपचार करणे सुरू केलेलं होतं.