Tirath Singh Rawat: उत्तराखंडच्या नव्या CMचं महिलांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य, तुफान टीका

मुंबई तक

नवी दिल्ली: उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे आता त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. राजकीय क्षेत्रासह मनोरंजन आणि इतर क्षेत्रातून देखील मुख्यमंत्री रावत यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आतापर्यंत अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा, जया बच्चन, गुल पनाग, महुआ मोइत्रा आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तीरथ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे आता त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. राजकीय क्षेत्रासह मनोरंजन आणि इतर क्षेत्रातून देखील मुख्यमंत्री रावत यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

आतापर्यंत अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा, जया बच्चन, गुल पनाग, महुआ मोइत्रा आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी महिलांवर भाष्य करणं थांबवलं पाहिजे: जया बच्चन

याविषयी खासदार जया बच्चन यांनी तीरथ सिंह रावत यांच्यावर जोरदार टीका केली. त्या असं म्हणाल्या की, ‘सर्वात आधी त्यांनी आपलं पद सांभाळावं. ते आत्ता नुकतेच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी महिलांवर भाष्य करणं थांबवलं पाहिजे. हे अशा मानसिकतेचे लोक आहेत जे कपड्यांवरुन महिलांविषयी अंदाज व्यक्त करतात.’

‘हे महिलांविषयी चुकीच्या मानसिकतेला खतपाणी घालत आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे आणि खूप दु:ख होतं की आज एकविसाव्या शतकातही मोठ्या पदावर बसलेले लोक अशा प्रकारचं भाष्य करीत आहेत.’

त्याचवेळी खासदार शिवप्रकाश शुक्ला हे तिथूनच जात होते. त्यावेळी जया बच्चन म्हणाला की, शुक्ला यांच्यासारख्या लोकांनी इतरांवर विचारपूर्वक भाष्य केले पाहिजे. तेव्हा शिवप्रकाश शुक्ला म्हणाले की, कुणीही इतरांच्या वेशभूषेबाबत भाष्य करणं योग्य नाही.

कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार, दाखल केलं भन्नाट प्रतिज्ञापत्र

मुख्यमंत्री रावतजी तुमचे विचार बदला म्हणजे देश बदलेल: प्रियंका चतुर्वेदी

दुसरीकडे शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तर स्वत:चा फोटो पोस्ट करतच रावत यांच्यावर टीका करणारं ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात की ‘रिप्ट जिन्स आणि पुस्तक. जे महिलांनी निवडलेल्या गोष्टींवरुन त्यांच्याबद्दलचं मतं तयार करतात, अशा पुरुषांपासून देशातील संस्कृती आणि संस्कारांना धोका आहे. मुख्यमंत्री रावतजी तुम्ही तुमचे विचार बदला म्हणजे देश बदलेल’, असा टोला प्रियंका चतुर्वेदी यांनी लगावला आहे.

‘तुमचा मेंदू फाटका आहे’, महुआ मोइत्रांची प्रचंड तिखट प्रतिक्रिया

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रांनी तर तुमचा मेंदू फाटका आहे अशा शब्दांत तीरथ सिंह रावत यांच्यावर टीका केली आहे. ‘उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणाले, खाली पाहिलं तेव्हा गमबूट होते. वर पाहिलं तर… एनजीओ चालवता आणि कपडे गुडघे फाटलेले घालता. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जेव्हा पाहिलं तेव्हा वर, खाली, पुढे, मागे सगळीकडे आम्हाला केवळ एक निर्लज्ज माणूस दिसला.एका राज्याची धुरा तुमच्या हाती आहे मात्र, मेंदू फाटका आहे तुमचा’, असं ट्विट मोइत्रा यांनी केलं आहे.

याशिवाय अभिनेत्री गुल पनाग हिने देखील रिप्ट जीन्स मधील आपला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

जस्टिस पुष्पा गनेडीवाला का आहेत चर्चेत?

पाहा उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांनी महिलांविषयी कोणतं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं?

एका कार्यक्रमात बोलताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सबाबत असं म्हटलं होतं की, ‘गुडघ्यावर फाटलेली जीन्स घातलेल्या महिला फाटलेल्या जीन्स घालतात. हे सगळं काय सुरु आहे? हे कशाप्रकारचे संस्कार आहेत? मुलांवर याचे काय संस्कार होतील? मुलांवर कसे संस्कार व्हावे हे पालकांवर अवलंबून असतं.’ असं वक्तव्य रावत यांनी केलं होतं.

तिरथ सिंह रावत यांची काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्र सिंह रावत यांना पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पक्षांतर्गत नाराजीची दखल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला घ्यावी लागली होती. त्यामुळे अखेर केंद्रीय नेतृत्वाने उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलाचा निर्णय घेऊन त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या जागी तीरथ सिंह रावत यांना बसवलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp