Savarkar: सावरकर हे मुस्लिमांचे शत्रू नव्हते, त्यांनी तर...: मोहन भागवत

Veer savarkar was not enemy Muslims Mohan Bhagwat Claim: वीर सावरकर हे मुस्लिमांचे कधीही शत्रू नव्हते. त्यांनी तर उर्दू गझल देखील लिहल्या आहेत. असा दावा मोहन भागवत यांनी केला आहे.
veer savarkar was not enemy muslims he wrote urdu ghazals said rss chief mohan bhagwat
veer savarkar was not enemy muslims he wrote urdu ghazals said rss chief mohan bhagwat (फाइल फोटो)

नवी दिल्ली: 'वीर सावरकर (Veer Savarkar) हे मुस्लिमांचे कधीही शत्रू नव्हते. एवढंच नव्हे तर त्यांनी उर्दूमध्ये गझलही लिहली होती.' असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी सावकरांवरील एका पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात म्हटलं. उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या 'वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

'स्वातंत्र्यापासून वीर सावरकरांविषयी लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. पण आता लोकांना या पुस्तकाद्वारे वीर सावरकरांबाबत बरीच माहिती मिळेल आणि ते सावरकरांना जाणून घेऊ शकतील. याशिवाय स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, योगी अरविंद यासारख्या दिग्गजांबाबत देखील योग्य माहिती लोकांना उपलब्ध करून देण्यात येईल.' असंही भागवत यावेळी म्हणाले.

पाहा नेमकं काय म्हणाले मोहन भागवत

'सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर ही मोहीम खूप वेगाने वाढली. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर यांना सातत्याने लक्ष्य केलं आहे. सध्या सावरकरांचे हिंदुत्व, विवेकानंदांचे हिंदुत्व असे वर्णन करणे ही आता एक फॅशन आहे. हिंदुत्व एक होते, आहे आणि शेवटपर्यंत एक राहील.' असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले.

'सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते आणि त्यांनी उर्दूमध्ये गझल लिहिली होती. मी आपल्याला सांगतो की, अशफाकुल्ला खान म्हणालेले की मी, मेल्यानंतर माझा पुढचा जन्म मी भारतात घेईन. त्यामुळे अशा लोकांची नावं आपण सतत घ्यायला हवी.' असं मत भागवत यांनी यावेळी व्यक्त केलं.

राजनाथ सिंह यांचा मोठा दावा

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना भाजप नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठा दावा केला आहे. 'महात्मा गांधी यांनी सांगितलं होतं म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानमध्ये तुरुंगात कैद असताना इंग्रजांकडे दया याचिका दाखल केली होती.' असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.

veer savarkar was not enemy muslims he wrote urdu ghazals said rss chief mohan bhagwat
'महात्मा गांधींनी सांगितलं म्हणून सावरकरांनी ब्रिटिशांकडे दाखल केलेली दया याचिका', राजनाथ सिंहाचा दावा

'सावरकरांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे सातत्याने सांगितले जाते. पण सावरकरांनी सुटकेसाठी याचिका दाखल केल्या नाहीत. पण साधारणपणे कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दया याचिका दाखल करा.' असे महात्मा गांधी म्हणाले होते.

'गांधीजींच्या सूचनेनंतरच त्यांनी दया याचिका दाखल केली होती. त्यावेळी महात्मा गांधींनी सावरकरांना ब्रिटिशांना सोडून द्यावं असं आवाहन केलं होतं. तेव्हा गांधीजींनी असंही म्हटलं होतं की, ज्याप्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत तशाच पद्धतीने सावरकर देखील स्वातंत्र्य चळवळ सुरु ठेवतील.' असं राजनाथ सिंह म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in