मराठी सिनेसृष्टीवर शोककळा! मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मुंबई तक

कसदार अभिनयाला विनोदाची किनार देत मराठी सिने आणि नाट्य रसिकांच्या मनात स्थान मिळवणारे लोकप्रिय अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज निधन झालं. गिरगाव येथील राहत्या घरी असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रदीप पटवर्धन हे मुंबईतील गिरगाव परिसरात वास्तव्यास होते. महाविद्यालयापासूनच त्यांनी अभिनयाचा गुण जोपासला. एकांकिकांमध्ये अभिनय करण्यापासून सुरूवात केल्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटातही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कसदार अभिनयाला विनोदाची किनार देत मराठी सिने आणि नाट्य रसिकांच्या मनात स्थान मिळवणारे लोकप्रिय अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज निधन झालं. गिरगाव येथील राहत्या घरी असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रदीप पटवर्धन हे मुंबईतील गिरगाव परिसरात वास्तव्यास होते. महाविद्यालयापासूनच त्यांनी अभिनयाचा गुण जोपासला. एकांकिकांमध्ये अभिनय करण्यापासून सुरूवात केल्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटातही अनेक भूमिका साकारल्या. व्यावसायिक रंगभूमीवरील त्यांच्या काही भूमिका फार गाजल्या. यात मोरूची मावशी या नाटकातील त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली.

“रंजना’ मधून उलगडणार अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास!!

नाटक, मालिका आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप पटवर्धन यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे सिने-नाट्य रसिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

‘मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांचं काम आजही स्मरणात राहावं असंच राहिलं. भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह त्यांनी मराठी रंगभूमी गाजवली. ‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमातील त्यांच्या रंजक भूमिकांनीही प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

‘धर्मवीर’ सिनेमा आनंद दिघेंच्या आडून एकनाथ शिंदेंचं महत्त्व वाढवण्यासाठी आणला गेला का?

प्रदीप पटवर्धन यांचे गाजलेले सिनेमे

प्रदीप पटवर्धन यांनी ‘एक फुल चार हाफ’, ‘डान्स पार्टी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘एक शोध’, ‘चष्मे बहाद्दर’, ‘गोळा बेरीज’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘पोलीस लाईन’, ‘व टू थ्री फोर’, ‘जर्नी प्रेमाची’, ‘परिस’, ‘थँक यू विठ्ठला’ यासह अनेक सिनेमांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp