National Film Awards: गोष्ट एका पैठणीची सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, मी वसंतरावलाही दोन पुरस्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हिंदी, मराठी, कन्नड, पंजाबी, तेलुगू, मणिपुरी यासह प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटांसाठीचे हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. गोष्ट एका पैठणीची या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन शंतनू रोडे यांनी केलं आहे. तर मी वसंतराव या पुरस्कारला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. राहुल देशपांडे यांना गायनासाठी तर ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी ध्वनी संयोजक अनमोल भावे यांना फिचर फिल्म श्रेणीत सर्वोत्तम ध्वनी संयोजनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

गोष्ट एका पैठणीची या मराठी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार

दिग्दर्शक शंतनू रोडे यांनी गोष्ट एका पैठणीची या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमात सायली संजीवने भूमिका साकारली आहे. एका तरूणीच्या स्वप्नांचा प्रवास या सिनेमातून उलगडतो. आपल्याकडे पैठणी असावी असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. असंच स्वप्न या सिनेमातल्या नायिकेचं आहे. या सिनेमाचं कथालेखन तसंच दिग्दर्शन शंतनू रोडे यांनी केलं आहे.

पार्श्वगायन कॅटेगरीमध्ये राहुल देशपांडे यांना मी वसंतराव या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. गोदाकाठ तसंच अवांछित या चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरींचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट सिनेमा फनरल या सिनेमाला जाहीर झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन विवेक दुबे यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार टकाटक या सिनेमातील भूमिकेसाठी अनिश गोसावीला जाहीर झाला आहे.

ADVERTISEMENT

‘तान्हाजी’ सिनेमाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठमोळ्या ओम राऊतने सांभाळली होती. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ओम राऊत आनंद व्यक्त करत म्हणाला,’तान्हाजी’ या सिनेमाला दोन पुरस्कार जाहीर झाल्याचा खूप आनंद होत आहे. आपल्या सिनेमाला पुरस्कार मिळणं हे खूप अभिमानास्पद आहे. शिवरांच्या मावळ्याची गाथा रुपेरी पडद्यावर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता”.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT