Me Vasantrao Review: वसंतराव देशपांडेच्या खडतर प्रवासाची तितकीच सुरेलमय गाथा
माझं घराणं हे माझ्यापासून सुरू होतं, हे आत्मविश्वासाने सांगणाऱ्या पंडीत वसंतराव देशपांडेची सांगतिक कारकिर्द ही यशोशिखरावर पोहचली असली तरी त्या शिखरावर पोहोचण्याचा त्यांचा प्रवास अतिशय खडतर होता. आपल्याला वसंतरावांची गाणी, नाट्यपदं आठवतात पण त्यांचा हा खडतर प्रवास आपल्यापर्यंत आजपर्यंत पोहचलेला नव्हता.. पण हा प्रवास त्यांच्याच नातवाने म्हणजेच प्रख्यात गायक राहुल देशपांडेने तीन तासांच्या सिनेमात अतिशय […]
ADVERTISEMENT

माझं घराणं हे माझ्यापासून सुरू होतं, हे आत्मविश्वासाने सांगणाऱ्या पंडीत वसंतराव देशपांडेची सांगतिक कारकिर्द ही यशोशिखरावर पोहचली असली तरी त्या शिखरावर पोहोचण्याचा त्यांचा प्रवास अतिशय खडतर होता. आपल्याला वसंतरावांची गाणी, नाट्यपदं आठवतात पण त्यांचा हा खडतर प्रवास आपल्यापर्यंत आजपर्यंत पोहचलेला नव्हता.. पण हा प्रवास त्यांच्याच नातवाने म्हणजेच प्रख्यात गायक राहुल देशपांडेने तीन तासांच्या सिनेमात अतिशय सुसंगत पद्धतीने मांडून रसिकांसमोर आणला आहे. या सांगतिक मैफीलीचं नाव मी वसंतराव..
पंडीत वसंतराव देशपांडे हे एक चतुरस्त्र व्यक्तीमत्व.शास्त्रीय संगीताने नटलेली एखादी बंदीश असो , वा सिनेमातील भावगीत असो किंवा एखादं नाट्यगीत या प्रत्येक संगीत प्रकारावर वसंतरावांची गायकी आपला ठसा उमटवून जाते. आणि हाच ठसा अगदी तंतोतंत मी वसंतराव या सिनेमातून आपल्या मनावर ठसून जातो..
मी वसंतराव या सिनेमाची गोष्ट म्हणजे अक्षरक्ष अनेक अडथळ्यांवर,संकटांवर आणि अपमानांवर मात करून स्वतची ओळख निर्माण करणाऱ्या एका सच्च्या कलाकाराच्या प्रवासाची गोष्ट आहे.. आणि ही गोष्ट वसंतरावांच्या आयुष्यात घडलेल्या अगदी मोजक्या पण महत्वाच्या प्रसंगाना आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या महत्वाच्या व्यक्तिमत्वांना पुढे पुढे घेत जात अगदी समर्पक परिणाम साधते.