'हे ढेकणं आणि गिधाडं सुनेत्रा पवारांचा घात करू शकतात..', मनोज जरांगे थेट बोलून गेले!
महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'हे ढेकणं आणि गिधाडं सुनेत्रा पवारांचा घात करू शकतात..'
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मनोज जरांगे थेट बोलून गेले!
Manoj Jarange on Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आज (31 जानेवारी) दुपारी 5 वाजता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता, महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घ्या.
मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया
"सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतायत हा चांगला विषय आहे. राजकिय डावपेच मी सांगू शकत नाही. अजित पवार यांच्या जागेवर त्यांचाच माणूस हवा होता."
पुढे त्यांनी असंही म्हटलं की, "हा त्यांचा डावपेच असू शकतो मी सांगू शकत नाही. सर्वांना घेऊन चालावं. जे गिधाड नव्हते ते आता घिरट्या घालायला लागले आहेत. त्यांच्यावर आता लक्ष ठेवावे लागेल. दादा हे दादा होते. दादांसोबत न दिसणारे गिधाड आता दिसू लागले आहेत. सुनेत्रा पवार यांनी अचानक जमलेल्या ढेकणांवर लक्ष ठेवावे. हे ढेकण आणि गिधाडं घात करू शकतात, सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबाला सोबत घ्यावं, हे ढेकणं खूप रक्त पिऊ शकतात, त्यावेळी कुटुंबच तुमच्या कामाला येईल. काही अडचणीमुळे सुनेत्रा पवार यांनी तातडीनं उपमुख्यमंत्री पद स्विकारले असावं. पार्थ आणि जय पवार यांनी दादांनी काही सल्ला दिलेला असेल त्याचे पालन करावे."
हे ही वाचा: "मी सुनेत्रा अजित पवार, उपमुख्यमंत्री म्हणून..." महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
तसेच, बीड पालकमंत्री पदाबाबत बोलताना ते म्हणाले की, "हे कुठेही पळतं. त्याला काही मिळत नाही. अजित पवार एवढेच फडणवीस हुशार आहेत. त्याला जवळ करणार नाहीत. आतापर्यंत यांचं दुखत होतं. पण यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.










