अक्षय शिंदे एन्काऊंटर: बदलापूर अत्याचार प्रकरणाचं आता पुढे काय?

मुंबई तक

अक्षय शिंदे एन्काऊंटरमुळे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात काय होईल, याकडे लक्ष लागले आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

अक्षय शिंदे एन्काऊंटर, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलीसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, पोलीस व्हॅनमधून जाताना अक्षय शिंदेने बंदूक हिसकावून गोळीबार केला. यावेळी सेल्फ डिफेन्समध्ये पोलीसांनी त्याच्यावर गोळीबार करत त्याला ठार केलं. या घटनेनंतर राजकारण तापलं असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणावर मत व्यक्त केलं आहे. त्यांनी दिलेल्या मतांमुळे या केसचं भवितव्य कसं ठरणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बदलापूर अत्याचार प्रकरणावर काय परिणाम होईल, यावर लोकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

    follow whatsapp