मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा
मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणासाठी सज्ज. छगन भुजबळ म्हणाले की जरांगेंना रोहित पवार, राजेश टोपे यांनी बसवलं उपोषणाला.

ADVERTISEMENT
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करणार असताना आता छगन भुजबळांनी मोठा दावा केला आहे. भुजबळांनी म्हटले की मनोज जरांगेंना रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी उपोषणाला बसवलं. भुजबळांच्या दाव्यावर आता जरांगेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाची घोषणा केली आहे, यावर छगन भुजबळांनी दिलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. भुजबळांनी केल्याचं विधान आणि त्यावर जरांगे पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.