धिरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांचं घेतलं दर्शन, स्वागतामध्ये दिली तुकोबांची पगडी
Dhirendra Shastri took darshan of Sant Tukaram Maharaj, gave Tukoba’s turban in reception

ADVERTISEMENT
धिरेंद्र शास्त्री यांना देवस्थानने संत तुकाराम महाराजांची गाथा भेट दिली. तसेच संस्थानने तुकोबांची पगडी घालून शास्त्री महाराजांचं स्वागत केलं. संत तुकाराम महाराजांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अडचणीत आलेल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री अखेर संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले. पुण्यात कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांना संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोध होत होता, त्यानंतर पुण्यात दाखल होताच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संत तुकाराम महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल दोनदा माफी मागितली