2 ऑगस्टची सकाळ झाली आणि सिनेसृष्टी हादरली! कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या एका उपासकाने स्वतःच्या आयुष्याला पूर्णविराम दिला. ज्यांच्या कला दिग्दर्शनाने असंख्य सिनेमांना अजरामर केले, त्या सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलंय.