Maharashtra Political Crisis : ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे घमासान; पुन्हा पुढची तारीख
हरिष साळवे यांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने पुढील तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होळीच्या सुट्टीनंतर सुरुच राहणार आहे. आता मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे. अजून दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे. त्यादरम्यान शिवसेना आणि ठाकरे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत. सर्व घटना घडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतरच सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे […]
ADVERTISEMENT
हरिष साळवे यांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने पुढील तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होळीच्या सुट्टीनंतर सुरुच राहणार आहे. आता मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे. अजून दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे. त्यादरम्यान शिवसेना आणि ठाकरे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत. सर्व घटना घडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतरच सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे […]
हरिष साळवे यांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने पुढील तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होळीच्या सुट्टीनंतर सुरुच राहणार आहे. आता मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे. अजून दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे. त्यादरम्यान शिवसेना आणि ठाकरे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत.
ADVERTISEMENT
सर्व घटना घडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतरच सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घ्यायला सांगितले, ठाकरे बहुमत चाचणीला समोरे गेले नाहीत – हरिश साळवे यांचा युक्तिवाद
दोन स्वतंत्र बैठका आहेत. कृपया एका मीटिंगचे मिनिट्स दुसर्यात मिसळून गोंधळ करुन घेऊ नका – कौल यांची विनंती.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
जर सरकारला बहुमत गमवावे लागले आणि एक गट येऊन म्हणतो की आमच्याकडे बहुमत आहे, तर शिंदे गटाला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी बोलावून राज्यपालांनी कोणती चूक केली? कौल यांचा सवाल.
विधिमंडळ आणि राजकीय पक्ष यांच्यात कृत्रिम भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा ठाकरे गटावर आरोप. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांनी हातात हात घालून जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कौल यांनी आज पुन्हा एकदा येडीयुरोप्पा प्रकरणाचा उल्लेख केला.
सर्वोच्च न्यायालयात आजच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT
-
11:45 AM – पर्यंत नीरज कौल युक्तीवाद संपवतील
12:15 PM – ॲड मनिंदर सिंग, महेश जेठमलानी युक्तीवाद संपवतील
1:00 PM – सॅालिसीटर जनरल युक्तीवाद संपवतील
2:00 PM – Rejoinder सुरूवात
4:00 PM – सुप्रीम कोर्टाचे निर्देश/निकाल
कालच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनाही काही सवाल केले होते. “अपात्रतेबाबतचे मुद्दे ठरवणं हे बाकी आहेत, त्यावेळी राज्यपाल बहुमताची चाचणी त्याच मुद्द्यावर कशी काय करू शकतात? तसंच अपात्रतेची टांगती तलवार असतानाही आमदार मतदान कसे करु शकतात?’ असा सवाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांना विचारला.
“इथे जे मुद्दे आहेत ते अपात्रतेच्या मुद्द्याशी देखील निगडीत आहेत. यावेळी सरन्यायाधीशांचा असा प्रश्न होता की, ज्यावेळी अपात्रतेबाबतचा मुद्दे ठरवणं हे बाकी आहेत त्यावेळी आपण बहुमताची चाचणी त्याच मुद्द्यावर कशी काय करू शकतो? त्याच आमदारांसोबत.. म्हणजे जो अपात्रतेबाबतचा कायदा आहे त्याचा उद्देश आणि बहुमत चाचणीचा उद्देश हे जर एकमेकांना हरताळ फासत असतील.. कारण पक्षांतरबंदीचा कायदा हा यासाठीच आणला होता कारण की, अशाप्रकारचं पक्षांतर मोठ्या प्रमाणात होऊ नये. पण अशाच प्रकारे पक्षांतर करून त्या आमदारांना सहभागी करून त्यावर जर बहुमत चाचणी घेतली तर या कायद्याच्या उद्देशाला हरताळ फासला जाईल”, असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला.
कौल म्हणाले की, “मुळात आमची केस ही पक्षांतर किंवा एखाद्या पक्षात विलीन होण्याचीच नाही. आम्ही कधीही एखाद्या पक्षात विलीन होण्याबाबत भाष्य केलेलं नाही. तो आमचा मुद्दाच नाही. आमचा फक्त पक्षांतर्गत विरोध हे आम्ही आतापर्यंत म्हणत आलो आहोत. आमचा पक्षांतर्गत विरोधाचा मुद्दा वेगळा आहे आणि सभागृहातील बहुमताचा मुद्दा वेगळा आहे. आम्ही कुठेही शिवसेना सोडलेली नाही.. किंवा सोडणार आहोत. आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत की नाही याचा निर्णय निवडणूक आयोग देईल. सभागृहात प्रश्न हा बहुमताचा होता. एका मुख्यमंत्र्यांनी त्यांचं बहुमत गमावलं होतं की नाही हा मुद्दा होता. त्यामुळे या दोन गोष्टी कोर्टाने वेगवेगळ्या करून पाहाव्यात.”
Eknath shinde Vs Uddhav thackeray :
दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court of India) महाराष्ट्रातील (Maharashtra Political Crisis) सत्तासंघर्षावर आणि आमदारांच्या अपात्रता नोटिसीवर अंतिम सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी होळीच्या सुट्ट्यांपूर्वी या प्रकरणातील युक्तिवाद संपविण्याबाबत शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही बाजूच्या वकिलांना निर्देश दिले होते. त्यानुसार मागील आठवड्यात ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद संपविला होता. तर या आठवड्यात शिंदे गटाचे वकील आणि राज्यपालांचे वकील त्यांचा युक्तिवाद संपवत आहेत. आज अखेरच्या दिवशी ॲड. नीरज किशन कौल, मनिंदर सिंग आणि महेश जेठमलानी हे युक्तिवाद करणार आहेत. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Maharashtra Political Crisis live updates)
ADVERTISEMENT