वामन म्हात्रे यांची महिला पत्रकारासोबत संतापजनक भाषा
बदलापूरमध्ये अत्याचाराविरोधात संताप व्यक्त करत असताना महिला पत्रकाराशी वामन म्हात्रे यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याने सर्वत्र विरोध होतोय.
ADVERTISEMENT
बदलापूरमध्ये अत्याचाराविरोधात संताप व्यक्त करत असताना महिला पत्रकाराशी वामन म्हात्रे यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याने सर्वत्र विरोध होतोय.
बदलापूरमध्ये आज एकीकडे दोन चिमुकल्यावरील अत्याचाराविरोधात संताप व्यक्त केला जात असताना दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्याने महिला पत्रकाराशी बोलताना अर्वाच्य भाषा वापरलीय. 'तू अशा बातम्या देतेय जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय' अशी अर्वाच्च भाषा शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी बोलताना वापरलीय. वामन म्हात्रे यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निशेध व्यक्त केला जातोय. पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया देखील उमटताहेत. मुख्यमंत्रांच्या ठाणे जिल्ह्यात त्यांच्याच पक्षाचे नेते अशी भाषा वापरत असतील तर दाद कुणाकडे मागायची? हा प्रश्न आता उपस्थित झालाय. या प्रकरणावरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी वामन म्हात्रे यांच्यावर टीका केलीय. 'अन्यायग्रस्त कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पत्रकाराबरोबर अर्वाच भाषा वापरण यातून हे प्रकरण दाबण्याचा किती प्रयत्न झाला हे स्पष्ट आहे.' अस वडेट्टीवार ट्विट करत म्हणाले आहेत. या प्रकरणात आता वामन म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिलीय. नेमक काय म्हणालेत वामन म्हात्रे जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT