मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उतरले सचिव निवडणुकीत!
मुखेडच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे सचिव बालाजी खतगावकर सहभागी होत आहेत. त्यांनी तयारी जोरात केली आहे.
ADVERTISEMENT
मुखेडच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे सचिव बालाजी खतगावकर सहभागी होत आहेत. त्यांनी तयारी जोरात केली आहे.
विधानसभेचे वारे आता जोरात फिरत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घटकांमध्ये नेत्यांची मुले, त्यांच्या नातेवाईक यांच्यासह आता खासगी सचिवांचा सहभागही वाढत आहे. गेल्या वेळी फडणवीसांचे पीए अभिमन्यु पवार यांची निवड झाली होती आणि ते विधानसभेत गेले होते. आता एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी खतगावकर मुखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरविण्याची तयारी करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयात कार्यरत असलेल्या खतगावकरांचे नाव मुखेडच्या दावेदारांमध्ये घेतले जात आहे आणि त्यामुळे भाजपचे नेते चर्चेत आले आहेत. एकनाथ शिंदे स्वत: खतगावकरांसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र विद्यमान आमदार भाजपचे आहेत आणि त्यामुळे फडणवीसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मुखेडच्या रणांगणातील राजकीय घडामोडीवरील महत्त्वाचे अपडेट येणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT