VIDEO:मायकल जँक्सनची मुंबईवारी आणि ठाकरी पाहुणचार
काही घटना आणि कार्यक्रम असे असतात की त्याचं ओझं उतरता उतरत नाही. राज्यात शिवसेना-भाजपचे युती सरकार हे १९९५ मध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यावेळी शिवसेनेत असलेले राज ठाकरे यांनी शिव उद्योग सेना स्थापन केली होती. शिव उद्योग सेनेतर्फे १९९६ साली मुंबईत पॉप स्टार मायकल जँक्सनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमासाठी घेतलेला सुमारे […]
ADVERTISEMENT
काही घटना आणि कार्यक्रम असे असतात की त्याचं ओझं उतरता उतरत नाही. राज्यात शिवसेना-भाजपचे युती सरकार हे १९९५ मध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यावेळी शिवसेनेत असलेले राज ठाकरे यांनी शिव उद्योग सेना स्थापन केली होती. शिव उद्योग सेनेतर्फे १९९६ साली मुंबईत पॉप स्टार मायकल जँक्सनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमासाठी घेतलेला सुमारे […]
ADVERTISEMENT
१९९६ साली शिवउद्योग सेनेच्या निधीउभारणीसाठी राज ठाकरे यांनी मुंबईत पॉप सिंगर मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम आयोजित केला होता. मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे त्याकाळात सत्तेत असलेल्या शिवसेनेचा पुढाकार होता. या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी स्थापन झालेल्या शिवउद्योग सेनेकडे होती. मायकेल जॅक्सनला भारतात आणण्यामागे खुद्द राज ठाकरेंचा मोठा हात होता. मायकेल जॅक्सन जेव्हा मुंबई विमानतळावर पोहोचला, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. लेझिम,बँड पथक अश्या मराठमोळ्या वातावरणात मायकल जँक्सनचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. विमानतळाबाहेर मायकल जँक्सनच्या फँन्सनी तुफान गर्दी केली होती. या उत्सफूर्त स्वागतामुळे त्यावेळी मायकल जँक्सनही भारावून गेला होता. तेव्हा त्याच्या स्वागतासाठी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यासह अनेक जण उपस्थित राहिले होते. विमानतळावरच्या स्वागतानंतर मायकेल जॅक्सननं बाळासाहेब ठाकरेंची राहत्या घरी भेटही घेतली होती. मुंबईतील ओबँरॉय या फाईव्हस्टार हॉटेलमध्ये मायकल जँक्सनच्या राहण्याची खास व्यवस्था करण्यात आली होती. त्याच्यासाठी खास गाडीचीही व्यवस्था केली गेली होती. १ नोव्हेंबर १९९६ ला मुंबईतीलअंधेरी क्रीडा संकुलात मायकल जॅक्सनची कॉन्सर्ट झाली. त्याआधी मुंबईतील वातावरण पूर्णपणे मायकल जँक्सनमय झालं होतं. अंधेरी क्रि़डा संकुलाबाहेर मायकलच्या फॅन्सनी तुफान गर्दी केली होती. मायकल जँक्सनच्या पॉप गाण्यांवर थिरकणारी मुंबईकर तरूण मुलं मुली मायकल जँक्सनचे फोटो असलेले टीशर्ट घालून कॉन्सर्टची वाट पाहत होते. काहींनी तर तिकीट मिळवण्यासाठी रात्रभर लाईनीत उभे होते.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अखेर १ नोव्हेंबरला मायकल जँक्सनचा कॉन्सर्ट अंधेरी क्रीडा संकुलात पार पडला. या कॉन्सर्टमध्ये मायकल जँक्सन आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये तुफान गायलाही आणि तितक्याच एनर्जीने त्याने डान्स करत अख्ख्या स्टेजचा ताबा घेतला होता. मायकल जँक्सनची कॉन्सर्ट तर झाली आणि तो अमेरिकेतही निघून गेला ही मात्र तेव्हा सत्तेत असलेल्या युती सरकारने या र्यक्रमावरील करमणूक शुल्क माफ केले होते. यावरून बरेच वादंग झाले. काही लोक न्यायालयात गेले. तब्बल १५ वर्षांनी, म्हणजे २०११ साली मुंबई उच्च न्यायालयाने करमणूक करत सवलत देण्याचा निर्णय रद्दबातल करून, ग्राहक पंचायत व विझक्राफ्ट यांना बाजू मांडण्याची संधी देऊन फेरसुनावणीचे निर्देश दिले होते. त्यामुळेच ही प्रक्रिया करून विझक्राफ्टला करमणूक शुल्क व अधिभार आकारणीतून सूट देण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आणि या कॉन्सर्टच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.. पुलाखालून आता बरंच पाणी वाहून गेलंय. ज्या शिव उद्योग सेनेसाठी मायकल जँक्सन थिरकला ती शिव उद्योग सेनाही आता नाहीये, ज्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला त्या राज ठाकरेंनी कालांतराने महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आपली वेगळी चूल मांडली. वांद्र्यातील बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीमध्ये, ज्या खाजगी रूममध्ये बाळासाहेब महत्वाच्या बैठका घ्यायचे त्या भिंतीवर बाळासाहेब आणि मायकल जँक्सन यांनी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून काढलेला फोटो मात्र अजूनही तसाच आहे. आणि याच काय त्या आठवणी आता मागे राहिलेल्या आहेत.
ADVERTISEMENT