VIDEO : राहुल गांधींनी खिशातून रुमाल काढून खर्गेंचा कुर्ता का पुसला?
सांगली येथे पुतळा लोकार्पण सोहळ्यात राहुल गांधी यांनी मल्लिकार्जून खरगे यांच्या कुर्त्यावरून धूळ पुसली.

ADVERTISEMENT
सांगली येथे पुतळा लोकार्पण सोहळ्यात राहुल गांधी यांनी मल्लिकार्जून खरगे यांच्या कुर्त्यावरून धूळ पुसली.
Rahul Gandhi News : सांगली येथे पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या खिशातून रुमाल काढून मल्लिकार्जून खरगे यांच्या कुर्त्यावरील धूळ पुसली. हा प्रसंग अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.