आदेश भावजींचा मुलगा सोहम बांदेकर आता येणार पोलिस दलात

मुंबई तक

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, असं म्हणत लाखो वहिनींच्या घरात भावोजी बनून जाणारे अभिनेते आदेश बांदेकर आणि मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगादेखील आईवडिलांच्या पाउलांवर पाऊल ठेवायला तयार झाला आहे. आदेश आणि सुचित्रा यांचा मुलगा असलेला सोहम बांदेकर आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.स्टार प्रवाहावर ‘नवे लक्ष्य’ ही मालिका लवकरचं […]

ADVERTISEMENT

google news

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, असं म्हणत लाखो वहिनींच्या घरात भावोजी बनून जाणारे अभिनेते आदेश बांदेकर आणि मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगादेखील आईवडिलांच्या पाउलांवर पाऊल ठेवायला तयार झाला आहे. आदेश आणि सुचित्रा यांचा मुलगा असलेला सोहम बांदेकर आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.स्टार प्रवाहावर ‘नवे लक्ष्य’ ही मालिका लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात सोहम पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. पीएसआय जय सुवर्णा दिक्षित असं त्याच्या भूमिकेचं नाव असून त्याची ही पहिलीच मालिका असणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण बांदेकर कुटुंबियांशी मुंबई तकने खास संवाद साधला, आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी यावेळी आपल्या मुलाच्या पदार्पणाविषयी भरभरून सांगितलं.