पूजा चव्हाण आहे तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

एक टिकटॉक स्टार ते सुसाईड मिस्ट्री, असा प्रवास राहिलेली ही बीडची पूजा चव्हाण…. पूजाने आत्महत्या केली. तिचं वय अवघं 22 वर्ष. पण एवढ्या लहान वयातही पूजा सोशल मीडिया आणि राजकारणातही चांगलीच अक्टीव्ह होती. इंन्स्टाग्रामवर फोटोशूट केल्याच्या पूजाच्या असंख्य पोस्ट आहेत. शिवाय टीकटॉकवरही तिचे व्हीडिओ असत. विविध गाण्यांच्या आणि डायलॉगवर नकला करतानाचे पूजाचे व्हीडिओ सध्या सोशल […]

social share
google news

एक टिकटॉक स्टार ते सुसाईड मिस्ट्री, असा प्रवास राहिलेली ही बीडची पूजा चव्हाण….

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

पूजाने आत्महत्या केली. तिचं वय अवघं 22 वर्ष. पण एवढ्या लहान वयातही पूजा सोशल मीडिया आणि राजकारणातही चांगलीच अक्टीव्ह होती.

इंन्स्टाग्रामवर फोटोशूट केल्याच्या पूजाच्या असंख्य पोस्ट आहेत. शिवाय टीकटॉकवरही तिचे व्हीडिओ असत. विविध गाण्यांच्या आणि डायलॉगवर नकला करतानाचे पूजाचे व्हीडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल झालेत.

हे वाचलं का?

हे पण वाचा- “ पूजा चव्हाणला न्याय मिळणार नसेल, तर शक्ती कायदा चाटायचा का?”

‘क्विन हू मै…किसी से भी डरती नहीं’ असे स्वत:ला महत्व देणारे अनेक कोट्स तिच्या फोटोज, टीकटॉक व्हीडिओवर आहेत.

ADVERTISEMENT

आयुष्य, जिद्द यांसारख्या विषयावरही तिने आपल्या फोटोजना अनेक कॅप्शन दिलेत. त्यामुळेच तिचे फोटो आणि व्हीडिओ पाहून एकंदरीतच तिचं व्यक्तिमत्व मनमेळावू असल्याचं दिसून येतं.

पण पूजा केवळ यातच रमायची नाही, तर राजकारण्यांशीही तिचे जवळचे संबंध होते. बीडची असल्यानं तिचे अनेक फोटो हे भाजपच्या माजी आमदार पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत दिसत आहेत. त्यांचे कार्यक्रम आणि प्रचारातही पूजाचा सहभाग होता. प्रचाराच्या अनेक फोटोमध्ये तर पूजा प्रीतम मुंडेंच्या अगदी बाजूलाच दिसतेय.

व्यायामांच्या शिबीर समारोहांना पूजा सहशिक्षिका म्हणूनही काम करत असे.

पूजाच्या बहुतांशी फोटोजचं लोकेशन हे बीडचं परळीच आहे.

आणि कदाचित मुंडे कुटुंबियांशी जवळीक आणि परळीची लेक म्हणून तिच्या आत्महत्येनंतर पंकजा मुंडेंनीही ट्विट करत म्हटलंय…

“पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. ह्या तरूणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्र पोलिसांना केली आहे.”

पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये बंजारा भाषा बोलली जातेय, बंजारा भाषा विदर्भात प्रामुख्याने बोलली जाते. याशिवाय ऑडिओ क्लिपमध्ये मंत्रालयातील बैठका, मुंबई दौरे याचा उल्लेख होतोय. यावरून याप्रकरणातील संशयाची सुई यवतमाळचे आणि शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे फिरत असल्याचं भाजपच्या आरोपांमधून दिसतंय.

पूजाचे या संजय राठोड यांच्यासोबतही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पहायला मिळतायत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांसारख्या भाजपच्या दिग्गज फळीनेही चौकशीची मागणी केली आहे.

पूजा मूळची बीडची…इंग्लिश स्पीकिंग कोर्स करण्यासाठी ती पुण्यात आली, पण वानवडीत जिथे राहत होती, तिथल्या इमारतीवरून उडी मारून तिने आत्महत्या केली. तिने कुठलीही सुसाईड नोट न लिहिल्यानं, तिच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. पण व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपवरून पूजाच्या मृत्यूचं राजकीय कनेक्शन जोडलं जातंय.

जाता जाता पूजाची सगळ्यात पहिली इंन्स्टाग्राम पोस्ट आम्ही तुम्हाला सांगतो.

विश्वास लोकांवर इतका करा की, तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील, आणि प्रेम सर्वांवर इतकं करा की, त्यांना तुम्हाला गमवायची भीती राहील.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT