महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती होणार?; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाली चर्चा
महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती होण्याची दाट शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती करण्याचा निर्णय लवकरच सरकारकडून घेतला जाणार असल्याचे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. यावेळी त्यांना पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कपात करण्याबद्दल चर्चा झाली का, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रासह देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढ होऊ लागली […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती होण्याची दाट शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती करण्याचा निर्णय लवकरच सरकारकडून घेतला जाणार असल्याचे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. यावेळी त्यांना पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कपात करण्याबद्दल चर्चा झाली का, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं.
महाराष्ट्रासह देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढ होऊ लागली आहे. दिवसागणिक रुग्ण वाढत असून, केंद्रातील आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. वाढत्या रुग्णवाढीमुळे काही राज्यांनी मास्क सक्ती केली असून, महाराष्ट्रातही होण्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबद्दल चर्चा करण्यात आली. मास्क सक्ती आणि पेट्रोल डिझेलवरील कर कपातीबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, “सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती करण्याबद्दल आजच्या बैठकीत चर्चा झाली. याबद्दलचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि टास्क फोर्स यांच्या अंतिम निर्णयानंतर येईल, असं वडेट्टीवार म्हणाले.
पेट्रोल-डिझेलच्या VAT कपातीमुळे सरकारला का भरलीये धडकी?