विराटने टेस्टचं कर्णधार पद सोडल्यानंतर जय शाह, राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया म्हणाले….

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विराट कोहलीने आज टेस्ट क्रिकेटचं कर्णधारपद सोडलं आहे. त्याचा हा निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये त्याने T20 चं कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर आता त्याने टेस्ट क्रिकेटचं कर्णधारपदही सोडलं आहे.

दक्षिण अफ्रिकेतील मालिका पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी संध्याकाळी विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलं असल्याची घोषणा केली आहे. विराट कोहलीने ट्विटरवर एक मेसेज शेअर करून याची घोषणा केली आहे.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात BCCI चे अध्यक्ष जय शाह, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

BCCIने विराट कोहलीला दिल्या शुभेच्छा

बीसीसीआयने विराट कोहलीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. विराटच्या ट्विटनंतर काही वेळातच बीसीसीआयचे ट्विट समोर आलं आहे. ज्यामध्ये बोर्डाने विराटला त्याच्या कसोटी कर्णधारपदाच्या आजवरच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय कसोटी कर्णधार म्हणून 40 सामने जिंकण्याच्या विक्रमाबद्दल बीसीसीआयने विराट कोहलीचे अभिनंदनही केले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

जय शाह यांनी काय म्हटलं आहे?

‘एक कॅप्टन म्हणून विराट कोहलीचं करिअर शानदार होतं. त्यासाठी त्याचे खूप खूप धन्यवाद. विराटने टीमला परफेक्ट बनवलं त्यामुळेच टीमने भारतात आणि भारताबाहेर चांगला परफॉर्मन्स केला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड टेस्टमध्ये मिळालेले विजय लक्षात राहण्याजोगे आहेत. वसीम जाफर यांनीही विराटचं कौतुक केलं आहे.’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट केलं आहे

राहुल गांधी म्हणाले, विराट तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट फॅन्ससाठी चांगला खेळ करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तुमच्या आयुष्याच्या या टप्प्यावरही ते सगळे फॅन्स तुम्हाला साथ देतील. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

भारतासाठी सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार

रेकॉर्डनुसार विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. विराटने एकूण 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून त्यापैकी 40 सामने जिंकले आहेत आणि 17 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली एकूण 11 सामने अनिर्णित राहिले आहेत.

सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार

• विराट कोहली – 40 कसोटी विजय

• एमएस धोनी – 27 कसोटी विजय

• सौरव गांगुली – 21 कसोटी विजय

कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीची कामगिरी

टेस्ट – 68

डाव – 113

धावा – 5864

सर्वोच्च धावा – 254*

सरासरी – 54.80

शतकं – 20

अर्धशतकं – 18

कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक धावा

विराट कोहली, 68 कसोटी – 5864 धावा

एमएस धोनी, 60 कसोटी – 3454 धावा

सुनील गावस्कर, 47 कसोटी – 3449 धावा

मोहम्मद. अझरुद्दीन, 47 कसोटी – 2856 धावा

सौरव गांगुली- 49 कसोटी-2561 धावा

सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार (कर्णधार म्हणून किमान 20 कसोटी) % विजय

71.93 – स्टीव्ह वॉ 57-41-9-7 (सामना-विजय-पराजय-ड्रॉ)

62.50 – डॉन ब्रॅडमन (25-15-3-6)

62.34 – रिकी पाँटिंग (77-48-16-13)

58.82 – विराट कोहली (68-40-17-11)

    follow whatsapp

    ADVERTISEMENT